

TRAI 30 day recharge rule ends 28 day plans calendar month plans grace period Jio Airtel VI
esakal
टेलिकॉम कंपन्यांच्या '२८ दिवसांच्या' गणितामुळे ग्राहकांच्या खिशातून जो १३ व्या महिन्याचा अतिरिक्त खर्च जात होता त्यावर आता सरकारने कडक पाऊल उचलले आहे. 'महिना म्हणजे ३० दिवस' हे साधे समीकरण डावलून कंपन्यांनी ग्राहकांना वर्षाला १३ वेळा रिचार्ज करायला भाग पाडले होते. मात्र भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दिलेल्या कडक निर्देशानंतर आता कंपन्यांना पूर्ण ३० दिवसांची वैधता असलेले प्लॅन्स आणणे अनिवार्य झाले आहे. यामुळे ग्राहकांची दरवर्षी होणारी एका महिन्याची अतिरिक्त लूट थांबण्यास मोठी मदत होणार असून कंपन्यांची ही नफेखोरी आता आटोक्यात आली आहे.