esakal | देशात 118.34 कोटी लोकांकडे मोबाईल, 75.75 कोटींपर्यंत इंटरनेट; TRAI ची आकडेवारी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

TRAI

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India - TRAI) ने बुधवारी 31 जानेवारी 2021 पर्यंतचा रिपोर्ट  जाहीर केला आहे.

देशात 118.34 कोटी लोकांकडे मोबाईल, 75.75 कोटींपर्यंत इंटरनेट; TRAI ची आकडेवारी जाहीर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात जानेवारी, 2021 मध्ये 96 लाख मोबाईल ग्राहक वाढले आहेत. सध्या देशातील एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या ही 118.34 कोटींवर गेली आहे. इंटरनेटची सुविधा देखील 74.74 कोटींवरुन वाढून 75.76 कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India - TRAI)ने बुधवारी 31 जानेवारी 2021 पर्यंतचा रिपोर्ट  जाहीर केला आहे. यामधून यासंदर्भातील सविस्तर माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये ग्राहकांची टेली-डेन्सिटी सर्वांत जास्त आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओकडे सर्वाधिक म्हणजेच 35.03 टक्के मोबाईल ग्राहक आहेत. त्यातील 19.50 लाख नवे ग्राहक जानेवारी महिन्यांमध्ये जोडले गेले आहेत. 

तर 29.62% टक्क्यांनी दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल आहे. एअरटेलने 58.90 लाख अर्थात जिओच्या तीनपट नवे ग्राहक जोडले आहेत. यामध्ये टाटा टेली सर्व्हिसेस लि. चे ग्राहक जोडले जाणे देखील कारणीभूत आहे. ग्राहकांमध्ये वोडाफोन-आयडीयाचे 24.58 टक्के तर बीएसएनएलचे 10.21 टक्के आणि एमटीएनएलचे 0.28 टक्के ग्राहक आहेत. 

हेही वाचा - Google Messages ऍपमध्ये आलं नवीन भन्नाट फिचर; आता करता येईल मेसेजही शेड्यूल

इंटरनेटचे एका महिन्यात एक कोटी नवे कनेक्शन
भारतात इंटरनेट ब्रॉडबँड 75.76 कोटी लोकांपर्यंत पोहोचले आहे. यामधील 73.42 कोटी इंटरनेट मोबाईल फोनमध्ये आहे. तर बाकी वायर-कनेक्शनवर आधारित इंटरनेट आहे. डिसेंबरमध्ये 74.74 कोटी लोकांकडे इंटरनेटची सुविधा होती. म्हणजे एक महिन्यात जवळपास 1.36 टक्क्यांची वाढ झाली आहे. जिओ कंपनी या ठिकाणी देखील अग्रभागी राहिली आहे. 

पश्चिम उत्तर प्रदेशात गतीने वाढ
जानेवारीमध्ये फक्त मुंबईमध्ये ग्राहक 0.28 टक्क्यांनी घटले. तर पश्चिम उत्तर प्रदेशात सर्वाधिक 6.45 टक्के ग्राहक वाढले. हिमाचलमध्ये 0.91 टक्के, दिल्लीमध्ये 0.83 टक्के, पूर्व उत्तर प्रदेशात 0.67 टक्के, हरियाणामध्ये 0.21 टक्के तर पंजाबमध्ये 0.09 टक्के ग्राहक वाढले. 

हेही वाचा - स्वस्तात मस्त! आता इतर कंपन्यांचे महागडे प्लॅन सोडा; BSNLनं आणलाय भन्नाट प्लॅन; जाणून घ्या

टेली-डेन्सिटी : 100 मधील 87 जण फोनवर
टेली-डेन्सिटीनुसार, प्रत्येकी 100 लोकांमागे जवळपास 87 लोकांचे फोन नंबर सक्रिय आहेत. यामध्ये सर्वांत पुढे दिल्ली आहे. याठिकाणी 100 लोकांमागे 274 फोन नंबर आहेत. तर बिहार सर्वांत मागे आहे. याठिकाणी टेली-डेन्सिटी फक्त 53.11 टक्के आहे. याशिवाय, हिमाचल प्रदेशमध्ये ही 152 टक्के, केरळमध्ये 129 टक्के, पंजाबमध्ये 121 टक्के, तमिळनाडूमध्ये 106 टक्के नोंद आहे. उत्तर भारतातील बाकी राज्यांमध्ये हरियाणामधील हरियाणामध्ये 93.37 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 88.30 टक्के, उत्तर प्रदेशात 68.79 टक्क्यांवर आहे. 
 

loading image