Twitter Blue Tick : परत मिळू लागलीय मोफत ब्लू टीक; अनेकांना मिळालीही, कशी? जाणून घ्या...

मृत्यू झालेल्या सेलिब्रिटींच्या अकाऊंटची ब्लू टीकही परत मिळाली आहे.
Twitter
Twitter Sakal

काही दिवसांपूर्वी ट्वीटरने सगळ्या अकाऊंट्सचे ब्लू टीक काढून घेतले आहेत. आता फक्त जे लोक पैसे भरतील, त्यांनाच ब्लू टीक मिळू शकणार आहे. यामुळे अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा आपल्या अकाऊंटचे ब्लू टीक गमावले आहेत. तर काही जणांचे ब्लू टीक पुन्हा एकदा मिळत आहेत.

Twitter
Twitter: इलॉन मस्कचा यू-टर्न! ट्विटरवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या खात्यांचे ब्लू टिक केले परत

ज्यांना ट्वीटरवर एक मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात, त्यांना त्यांचं ब्लू टीक परत मिळालं आहे. आत्तापर्यंत ट्वीटरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर असलेल्यांचे ब्लू टीक पपत आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या सेलिब्रिटींनी टीक परत मिळाले नाही, त्यांना काही काळात नक्कीच मिळतील.

Twitter
Twitter Blue Tick : उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ब्लू टीक कायम, पण CM शिंदेंच राहिले नाही Verified

मृत्यू झालेल्या सेलिब्रिटींनाही मोफत ब्लू टीक परत मिळाली आहे. त्यामुळे हे लक्षात येतं की, ज्यांचे जास्त फॉलोवर्स आहेत, त्यांना पुन्हा मोफत ब्लू टीक मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट, अभिनेता शाहरुख खान, विराट कोहली, एम एस धोनी, बिल गेट्स, प्रियंका चोप्रा यांनीही आपले ब्लू टीक गमावले होते. मात्र काही काळानंतर त्यांना त्यांची ब्लू टीक परत मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com