Two wheeler चावीसोबत येणारी छोटी अल्युमिनियम चीप जपून ठेवा, नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two wheeler

Two wheeler चावीसोबत येणारी छोटी अल्युमिनियम चीप जपून ठेवा, नाहीतर...

Two wheeler Key : नवीन दुचाकी घेतली की, त्यासोबत मिळणाऱ्या चावीला एक अल्युमिनियमची एक छोटीसी चीप येते त्यावर एक 5 आकडी क्रमांक असतो. ती चीप कशासाठी असते असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

हेही वाचा: Two Wheeler Tips : टू-व्हिलर सर्व्हिसिंग करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

एवढीशी दिसणारी ती चीप फार महत्वाची असते. म्हणून ती जपून ठेवणे गरजेचे आहे. ती जी चीप असते, त्यावरचा नंबर हा त्या किल्लीचा अनुक्रमांक असतो, किल्ली बनवताना जे गाळे बनवतात त्यातील असलेल्या फरकांमुळेच एक किल्ली दुसर्‍या कुलूपाला लागत नाही.

हेही वाचा: दुचाकी वाहन तळाचे काम रखडले

चीप जपून का ठेवावी?

गाड्यांसाठी कुलूप आणि किल्ल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात बनवल्या जातात. परंतु प्रत्येक सेट गाडीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळा असावा लागतो, यासाठी कॉम्प्युटर प्रोग्राम असतात, आणि त्याला ओळखण्यासाठी तो अनुक्रमांक दिलेला असतो.

जर तुमची किल्ली हरवली, तुटली तर या क्रमांकावरुन नवीन किल्ली बनवता येते म्हणुन ही चीप जपुन ठेवणे चांगले

हेही वाचा: बेवारस दुचाकी नेण्याचे पोलिसांचे आवाहन

क्रमांक किती आकडी असतात

  • यातला क्रमांक कितीही आकडी असु शकतो, उदाहरणार्थ पाच आकडी क्रमांकाचे साधारण ८० हजार कॉम्बिशन बनवतात, त्यानंतर हा क्रमांक परत येऊ शकतो.

  • सहा आकडी क्रमांकामधे ही शक्यता आठ लाख असते, त्यानंतर पुनरावृत्ती होऊ शकते.

हेही वाचा: दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या

  • सुरक्षिततेच्या दृष्टीने काही कॉम्बिशन्स टाळले जातात, उदाहरणार्थ १००००० सारख्या नंबरचा प्रोग्राम, हे कुलुप एखाद्या तारेने सुध्दा सहज उघडले जावु शकते.

  • ही व्यवस्था दोन्ही म्हणजे फक्त किल्ली असलेल्या वहानांसाठी आणि electronic lock असलेल्या वहानांसाठी थोड्याफार फरकाने सारखीच असते

  • ग्राहकाच्या सोयीसाठी एका गाडीतील सर्व प्रकारच्या कुलपांसाठी एक समान किल्ली दिली जाते.

हेही वाचा: दुचाकी ‘रॅली’तून प्रशासनाचे लक्ष वेधले

  • आत्ताच्या काळात वहानाच्या सुरक्षिततेसाठी याच्या किल्लीबरोबर चिप न देता बारकोड दिला जातो

  • कंपनीत गाडी जेंव्हा Offline होते तेंव्हा हा बारकोड स्कॅन करुन सिस्टिममधे सेव्ह केला जातो, तो बिलावर पण लिहीला जातो.

हेही वाचा: Crime Update : सराईत दुचाकी चोरट्यास सिन्नरला अटक; 4 दुचाकी चोरल्याची कबुली

  • किल्ली हरवली तरी या क्रमांकावरुन परत त्याच गाडीची किल्ली सहजपणे बनवून मिळू शकते, अनुक्रमांक माहित नसेल - स्टिकर / चिप हरवली तरी चॅसिस नंबरवरुन त्या गाडीला कुठल्या अनुक्रमांकाची किल्ली लागेल हे पण सहज समजू शकते

  • गाडीच्या इन्शुरन्स क्लेम, चोरी इत्यादी महत्वाच्या प्रसंगी हे रेकॉर्ड कंपनीकडून मागवता येते

Web Title: Two Wheeler Key Aluminium Chip Importance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Two Wheeler