
Uber Bug : उबरमध्ये चुकून फ्री ट्रिप बुकींगचं दिसत होतं ऑप्शन, लोकांनी बगचा फायदा घेत केली फ्री राईड, वाचा पुढे काय झाले?
उबेर हे एक ॲप आहे. जे लोकांना भाड्याने कार किंवा ऑटो इत्यादी सुविधा पुरवते. या कंपनीच्या सिस्टीममध्ये एक बग आला होता. ज्यामूळे लोकांना मोफत ट्रिप बुक करण्याचा पर्याय दिसू लागला होता. तो बग एका तरूणाने शोधून दिला.
उबेरच्या ॲप्लिकेशनमध्ये आलेल्या बगबद्दल कंपनीला काहीही कल्पना नव्हती. त्यामूळे अनेक लोकांनी या फुटक सेवेचा लाभ घेतला. अनेकांनी मोफत कॅब बुक केल्या. लोकांनी एक रुपयाही न चुकता राईडचा आनंद लुटला. पण, एका भारतीय व्यक्तीने याचा खुलासा केल्यावर कंपनीला माहिती मिळाली.

आनंद प्रकाश यांची पोस्ट
हे प्रकरण 2017 मधील आहे. Uber च्या या बगचा खुलासा आनंद प्रकाश नावाच्या व्यक्तीने 2017 मध्ये केला होता. त्याने कंपनीला बग कळवला. प्रकाश एका हॅकिंग फर्मचा संस्थापक आहे. अलीकडेच प्रकाश यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. जिथे त्यांनी हा प्रसंग शेअर केला आहे. प्रकाश यांनी हा बग कसा सापडला हे सांगितले आहे.
प्रकाशने शोधलेला बग काही लहान बग नव्हता. तो वेळीच सापडला नसता तर कंपनीला मोठा फटका सहन करावा लागला असता. पण, हा बग शोधण्याआधी लोकांनी या सेवेचा भरपूर आनंद लुटला.पण यामुळे कंपनीचे नुकसान झाले असेल हे उघड आहे.
कसा शोधला बग
अवैध पेमेंट पद्धत वापरून वापरकर्ते पैसे न देता यूएस आणि भारत या दोन्ही ठिकाणी फुकटात प्रवास करत होते. हे लक्षात येताच आनंद प्रकाश यांनी या गोष्टीचा पुरावा म्हणून एक व्हिडिओही बनवला. जो आनंदनी लिंक्डइन पेजवर शेअर केला. बग शोधल्यानंतर आनंद यांनी लगेच उबेरला कळवले. आणि कंपनीने या समस्येचे त्याच दिवशी निराकरण केले. उबेरनेही प्रकाश यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कार्यासाठी त्यांना बक्षीस दिले.