Tech Layoff : गुगल पाठोपाठ आता 'ही' सर्च इंजिन कंपनी देणार 20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचं सत्र काही केल्या थांबताना दिसून येत नाहीये.
Tech Companies Layoffs
Tech Companies LayoffsSakal

Yahoo Layoff : कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचं सत्र काही केल्या थांबताना दिसून येत नाहीये. आता Yahoo या टेक कंपनीनेही कर्मचारी कपात सुरू केली आहे. असे सांगितले जात आहे की, कंपनी 20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते.

1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका :

कंपनी एकूण कर्मचार्‍यांपैकी 20% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते. अहवालानुसार, या कपातीमुळे Yahoo च्या 50% पेक्षा जास्त अॅड टेक कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. याचा परिणाम 1,600 हून अधिक लोकांवर होणार आहे.

गुरुवारी याहूमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते की, कंपनीतील 12 टक्के म्हणजेच एक हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि येत्या 6 महिन्यांत कंपनी उर्वरित 8 टक्के म्हणजेच 600 लोकांना कामावरून काढून टाकेल.

एका मुलाखतीत, Yahoo चे CEO म्हणाले की, नोकरीवरून काढण्याचा निर्णय हा आर्थिक मुद्द्यांमुळे झालेला नाही.

Tech Companies Layoffs
Bank News : PNB आणि बँक ऑफ बडोदाचा ग्राहकांना झटका; RBI च्या घोषणेनंतर घेतला मोठा निर्णय

यापूर्वी मनोरंजनाच्या विश्वात नाव कमावणाऱ्या डिस्नेमध्येही कर्मचारी कपात सुरू झाली आहे. कंपनीने सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी याबाबत माहिती दिली. बॉब यांनी गेल्या वर्षीच सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात :

अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. बुधवारीच टेक कंपनी झूमने 1300 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. सोमवारी डेलने आपल्या सहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com