भारतीयांच्या प्रतिभेचा अमेरिकेला मिळतोय फायदा; एलन मस्क यांचे ट्विट

भारतीयांच्या प्रतिभेचा अमेरिकेला मिळतोय फायदा; एलन मस्क यांचे ट्विट
Summary

गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडोबनंतर आता ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान झाली आहे. यानंतर टेस्लाचे एलन मस्क यांनी सोमवारी ट्विटरवरून भारतीयांच्या प्रतिभेचं कौतुक केलं आहे.

जॅक डोर्सी हे ट्विटरच्या सीईओ पदावरून पायऊतार झाल्यानंतर पराग अग्रवाल यांच्याकडे सीईओ पदाची धूरा सोपवण्यात आली आहे. यामुळे आता सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीयांचा दबदबा वाढत चालला आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडोबनंतर आता ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान झाली आहे. यानंतर टेस्लाचे एलन मस्क यांनी सोमवारी ट्विटरवरून भारतीयांच्या प्रतिभेचं कौतुक केलं आहे.

एलन मस्क यांनी म्हटलं की, भारतीय प्रतिभेचा अमेरिकेला फायदा होत आहे. मस्क यांनी पॅट्रिक कोलिसन यांच्या ट्विटला रिप्लाय देताना अशी प्रतिक्रिया दिली आहे. पॅट्रिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अडोब, आय़बीएम, पालो अल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे सीईओ भारतीय वंशाचे आहेत. तंत्रज्ञान जगतात भारतीयांचे हे यश पाहणं खूपच सुंदर आहे.

भारतीयांच्या प्रतिभेचा अमेरिकेला मिळतोय फायदा; एलन मस्क यांचे ट्विट
बंदी असलेला कंटेंट न हटवल्यानं गूगलला दंड

२००६ मध्ये स्थापन झालेल्या ट्विटरच्या सीईओ पदी जॅक डोर्सी यांची २००७ मध्ये नियुक्ती झाली होती. त्यानंतर २००८ मध्य त्यांना पायऊतार व्हावं लागलं. पुढे पुन्हा २०१५ मध्ये ते सीईओ झाले. २०१८ ला ट्विटरने त्यांच्या ट्विटमध्ये अक्षरांची संख्या १४० वरून २८० इतकी केली. तसंच ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी हे त्यांच्या पहिल्या ट्विटमुळे चर्चेत आले होते. त्यांनी आपलं पहिलं ट्विट तब्बल २.९ मिलियन डॉलरला विकलं होतं.

सध्या जागतिक पातळीवर टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये बहुतांश भारतीय उच्च पदावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे आहेत. अडोबचे सीईओ हे शंतनू नारायण आहेत. तंत्रज्ञानात भारतीयांचा वाढता दबदबा हा अभिमानास्पद असल्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com