Vi Prepaid Plan : 28 दिवसांच्या प्लॅनमध्ये फक्त 4 रुपये जास्त, मिळेल 56 दिवस वैधता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vi Prepaid Plan

28 दिवसांच्या प्लॅनमध्ये फक्त 4 रुपये जास्त, मिळेल 56 दिवस वैधता

Vi कंपनी आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करते मात्र, कंपनीचे दोन रिचार्ज प्लॅन असे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 4 रुपयांच्या फरकाने 28 दिवस जास्तीची वैधता दिली जाते. पहिला रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, तर त्यामध्ये 4 रुपये अधिक भरल्यास तुम्हाला 28 दिवस अधिक म्हणजे तब्बल 56 दिवसांची वैधता मिळेल. त्यामुळे जर तुम्ही Vi चे ग्राहक असाल आणि कमी किमतीत थोडा अधिक व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरु शकतो. चला या प्लॅनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Vi कंपनीचा एक रिचार्ज प्लॅन ज्याची किंमत 475 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.

याशिवाय, Vi कंपनीच्या प्लॅनमध्ये “बिंज ऑल नाईट” आणि “वीकेंड रोल ओव्हर” ची सुविधा देखील समाविष्ट आहे. Binge All Night अंतर्गत, तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मोफत इंटरनेट सुविधा दिली जाते, जी तुमच्या दैनंदिन डेटा मर्यादेतून वजा केली जात नाही. याशिवाय, शनिवार आणि रविवारी वीकेंड रोलओव्हरमध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंतचा उर्वरित डेटा तुम्ही वापरू शकता.

हेही वाचा: बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

परंतु तुम्हाला या किमतीच्या आसपास जास्त व्हॅलिडीटी असलेला प्लॅन हवा असल्यास, फक्त 4 रुपये अतिरिक्त देऊन तुम्ही थेट 56 दिवसांची वैधता मिळवू शकता. होय, Vi कंपनी 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे , ज्यामध्ये तुम्हाला 56 दिवसांची पूर्ण व्हॅलिडीटी मिळते. फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. हा प्लॅन “बिंज ऑल नाईट” आणि “वीकेंड रोल ओव्हर” च्या फीचर्ससह येतो.

हेही वाचा: शिवराय आणि रामदासांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही - सुप्रिया सुळे

Web Title: Vi Plan With Rs 475 Plan Comes With 28 Days Validity Rs 479 Plan Gives 56 Days Validity For Just 4 Rupee More

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Prepaid Plan