
शुभांशू शुक्ला यांनी ISS मधील अनुभवातून गगनयान मोहिमेसाठी मोलाची माहिती मिळवली.
गगनयान मोहीम २०२७ मध्ये भारताला मानवी अंतराळ उड्डाणात चौथा देश बनवेल.
इस्रोने रॉकेट आणि प्रशिक्षण पूर्ण केले असले तरी २३०० चाचण्या बाकी आहेत.
Shubhanshu Shukla Video : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेच्या तयारीला वेग आला असून भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी या मोहिमेसाठी पूर्ण तयारी दर्शवली आहे. इस्रोने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अॅक्सियम मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) दोन आठवडे घालवलेल्या शुभांशू यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत आपले अनुभव शेअर केले. “अंतराळात भीती वाटणे स्वाभाविक आहे पण माझ्या मागे असलेल्या विश्वासू टीममुळे मी माझे आयुष्य त्यांच्यावर सोपवले,” असे ते म्हणाले.