Shubhanshu Shukla : अंतराळवीर शुभांशु शुक्लाचं स्पेस मिशन पुन्हा लांबणीवर; उड्डाणाला उशीर होण्यामागं काय आहे कारण?

Shubhanshu Shukla Space mission delayed again : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या अ‍ॅक्सिऑम मिशन-4 ला पुन्हा विलंब झाला असून आता हे मिशन २२ जूननंतरच प्रक्षिपित होणार आहे.
Shubhanshu Shukla Space mission delayed again
Shubhanshu Shukla Space mission delayed againesakal
Updated on

Shubhanshu Shukla Space mission : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या बहुप्रतीक्षित अ‍ॅक्सिऑम मिशन-4 ला पुन्हा एकदा विलंब झाला असून, आता हे मिशन २२ जूनपूर्वी उड्डाण करणार नसल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. या मिशनच्या माध्यमातून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) प्रस्थान करणाऱ्या काही मोजक्या भारतीयांपैकी एक ठरणार आहेत.

अ‍ॅक्सिऑम स्पेस, नासा आणि स्पेसएक्स यांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले की, "अंतराळ स्थानकाच्या झ्वेजदा सेवेच्या विभागात नुकतेच काही दुरुस्तीसंदर्भातील काम पूर्ण करण्यात आले असून, त्याची पूर्तता आणि अन्य मूल्यांकनासाठी NASA ला थोडा अधिक वेळ हवा आहे. त्यामुळे हे उड्डाण २२ जूनपूर्वी होणार नाही."

या मिशनसंदर्भात सुरुवातीस २९ मे रोजी प्रक्षेपणाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र फाल्कन ९ रॉकेटच्या बूस्टरमध्ये द्रव ऑक्सिजन गळती आढळून आल्यानंतर या मिशनला आधी ८ जून, नंतर १० व ११ जून, आणि शेवटी १९ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले. आता पुन्हा एकदा उड्डाणाच्या तारखेत बदल करत हे मिशन २२ जूनच्या पुढे ढकलले गेले आहे.

Shubhanshu Shukla Space mission delayed again
Shubhanshu Shukla Update : शुभांशू शुक्ला यांचे अंतराळ मिशन राकेश शर्मा यांच्या मोहिमेपेक्षा वेगळं कसं आहे? चला जाणून घेऊया..

दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) नेही यासंदर्भातील माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दिली आहे.

अ‍ॅक्सिऑम मिशन-4 हे खाजगी स्वरूपाचे चौथे अंतराळ मिशन आहे. या मिशनचे नेतृत्व अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिट्सन करत आहेत. भारतीय हवाई दलाचे पायलट व ISRO चे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे या मिशनचे पायलट म्हणून सहभागी आहेत. त्यांच्यासोबत हंगेरीचे टिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोस युजनांस्की-व्हिस्निव्हस्की हे दोन मिशन स्पेशालिस्ट आहेत.

शुभांशु शुक्ला हे ISS वर पोहोचणारे मोजक्या भारतीय अंतराळवीरांपैकी एक ठरणार असून, तेथे त्यांच्या नेतृत्वाखाली सात भारतीय शास्त्रीय प्रयोग केले जाणार आहेत. तसेच NASA बरोबर संयुक्त वैज्ञानिक संशोधनही करण्यात येणार आहे. हे प्रयोग भारताच्या अंतराळ संशोधन क्षमतेला एक नवा आयाम देणारे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Shubhanshu Shukla Space mission delayed again
Shubhanshu Shukla : लढाऊ वैमानिक ते अंतराळवीर! कोण आहेत भारताचे हिरो शुभांशु शुक्ला? थरारक प्रवास जाणून थक्क व्हाल..

अ‍ॅक्सिऑम स्पेसने मिशनच्या सुरळीततेसाठी सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि तपासणी केल्याचे स्पष्ट केले आहे. हे मिशन केवळ एक अंतराळ प्रवास न राहता, भविष्यातील व्यावसायिक अंतराळ स्थानकाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

अंतराळप्रेमींसाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, एक भारतीय अंतराळवीर नव्या दारात पाऊल ठेवत असून, त्यांचे अंतराळप्रवासाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे थोडा विलंब असला तरी अपेक्षांचे क्षितिज अजूनही तितकेच तेजस्वी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com