Recharge Plans: 'या' कंपनीने लाँच केला स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन, किंमत २५ रुपये; हाय-स्पीड डेटाचा मिळेल फायदा

खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने एअरटेल आणि जिओला टक्कर देण्यासाठी दोन स्वस्तात मस्त प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्सची किंमत फक्त २५ रुपये आणि ५५ रुपये आहे.
Recharge Plans
Recharge PlansSakal

Vodafone Idea New Prepaid Plans: खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने एअरटेल आणि जिओला टक्कर देण्यासाठी दोन स्वस्तात मस्त प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्सची किंमत फक्त २५ रुपये आणि ५५ रुपये आहे. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अ‍ॅड-फ्री म्यूझिकचा अ‍ॅक्सेस मिळेल. Vi ने Hungama Music भागीदारी केली आहे. ज्यामुळे यूजर्सला प्लॅन अंतर्गत मोफत म्यूझिकचा फायदा मिळेल.

हे दोन्ही ४जी डेटा वाउचर आहेत. या प्लॅन्सचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह बेस प्लॅन असणे गरजेचे आहे. वोडाफोन आयडियाच्या या दोन स्वस्त प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Recharge Plans
Apple iPhone 15: लाँचआधीच iPhone 15 चे फीचर्स लीक, किंमतीचाही खुलासा; पाहा संपूर्ण डिटेल्स

Vi चा २५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Vi ने यूजर्ससाठी अवघ्या २५ रुपयांचा डेटा वाउचर प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला १.१ जीबी हाय-स्पीड ४जी डेटा दिला जात आहे. या डेटाचा फायदा तुम्ही २४ तास घेऊ शकता. तसेच, ७ दिवसांसाठी अ‍ॅड-फ्री म्यूझिक देखील मिळेल. तुम्हाला जर अ‍ॅड-फ्री म्यूझिक नको असल्यास १९ रुपयांचा ४जी डेटा वाउचर देखील उपलब्ध आहे. प्लॅनची वैधता देखील १ दिवस आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Vi 4G चा ५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीने २५ रुपयांसोबतच ५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील लाँच केले आहे. वीआयच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ३.३ जीबी ४जी हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. या प्लॅनची वैधता ७ दिवस आहे. २५ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच यात देखील अ‍ॅड-फ्री म्यूझिकची सुविधा मिळते. तुम्ही महिनाभर अ‍ॅड-फ्री म्यूझिकचा फायदा घेऊ शकता.

वीआयकडे ७५ रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. ७ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये ६ जीबी हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. मात्र लक्षात घ्या की या प्लॅन्सचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह बेसिक रिचार्ज प्लॅन असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Airtel Offer: एअरटेल यूजर्सला मोफत देत आहे तब्बल 50GB डेटा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com