जबरदस्त रिचार्ज प्लॅन; रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत फ्रीमध्ये वापरा अनलिमिटेड डेटा

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 16 February 2021

या खास फायद्यासाठी युजर्सला कोणतीही अतिरिक्त किंमत द्यावी लागणार नाही. अनलिमिटेड डेटा प्लॅनमध्ये कोणतीही मर्यादा नसेल. त्याचबरोबर प्लॅननुसार युजर्सला विकेंड डेटा रोलओव्हरचाही फायदा मिळेल. 

नवी दिल्ली- जर तुम्ही Vodafone Idea चे (आता Vi) युजर असाल तर तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे. व्होडाफोन-आयडियाने आपल्या प्रीपेड युजर्सला एक शानदार भेट दिली आहे. Vi ने आपल्या ग्राहकांना फ्रीमध्ये हायस्पीड इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. व्होडाफोन आयडियाची ही 'बिंज ऑल नाइट' ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या प्रीपेड युजर्सला रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही फेअर युसेज पॉलिसीच्या (एफयूपी) अनलिमिटेड डेटा वापरण्याची संधी देत आहे. काही रिचार्ज प्लॅन्स वगळता बहुतांश प्रीपेड प्लॅनमध्ये ही ऑफर मिळत आहे. व्होडाफोन-आयडियाशिवाय इतर कोणतीही कंपनी सध्या अशी ऑफर आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये देत नाहीये. 

या प्लॅन्सबरोबर मिळेल हा खास फायदा
व्होडाफोन-आयडियाच्या वेबसाइटनुसार 249 रुपये, 299 रुपये, 398 रुपये, 399 रुपये, 449 रुपये, 499 रुपये, 555 रुपये, 595 रुपये, 598 रुपये, 599 रुपये, 795 रुपये, 819 रुपये, 1197 रुपये, 2399 रुपये आणि 2595 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर बिंज ऑल नाइट ऑफरचा फायदा मिळेल. व्होडाफोन-आयडियाच्या या खास डेटा ऑफरमध्ये अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळतो. या खास फायद्यासाठी युजर्सला कोणतीही अतिरिक्त किंमत द्यावी लागणार नाही. अनलिमिटेड डेटा प्लॅनमध्ये कोणतीही मर्यादा नसेल. त्याचबरोबर प्लॅननुसार युजर्सला विकेंड डेटा रोलओव्हरचाही फायदा मिळेल. 

हेही वाचा- मोबाइलचं बिल वाढणार; टेलिकॉम कंपन्या घेऊ शकतात निर्णय

युजर्सला आता 3 खास ऑफर 
व्हो़डाफोन-आयडियाच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये या ऑफर्स घेतल्यानंतर कंपनी आपल्या युजर्सला आणखी तीन खास ऑफर देत आहे. पहिला डबल डेटा ऑफर आहे. यामध्ये कंपनी आपल्या काही रिचार्ज प्लॅन्सवर दररोज दुप्पट डेटा देत आहे. कंपनीची दुसरी खास ऑफर विकेंड डेटा रोलओव्हर आहे. या ऑफरमध्ये युजर्स विकडे्जमध्ये वापर न केलेला डेटा विकेंडला वापरु शकतो. आता तिसरी ऑफर ही अनलिमिटेड डेटा देणारी आहे. या ऑफरमध्ये युजर्सला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत फ्रीमध्ये डेटा मिळेल. 

हेही वाचा- ऑनलाइन खरेदी करताय? फसवणूक टाळायची असेल तर बातमी नक्की वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vodafone Idea VI Offering Unlimited Data to night time free data Between 12 to 6 AM