Washington based Microsoft overtook Apple as the world most valuable company
Washington based Microsoft overtook Apple as the world most valuable company

Apple ला धोबीपछाड! मायक्रोसॉफ्ट ठरली जगातील सर्वात महागडी कंपनी

जगातील सर्वात महागडी कंपनी ठरत मायक्रोसॉफ्टने Apple कंपनीला मागे टाकले आहे. २०२४ च्या सुरुवातीला घटत्या मागणीमुळे Appleच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती.

नवी दिल्ली- जगातील सर्वात महागडी कंपनी ठरत मायक्रोसॉफ्टने Apple कंपनीला मागे टाकले आहे. २०२४ च्या सुरुवातीला घटत्या मागणीमुळे Appleच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. गेल्या काही दिवसांत मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या शेअर्सच्या किंमत वाढल्या आहेत. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. (Microsoft overtook Apple as the world's most valuable company on Thursday)

वॉशिंग्टन स्थित मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या शेअर्सच्या किंमती मागील काही दिवसांत १.६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बाजार मूल्य २.८७५ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांकडून कंपनीला पसंदी मिळत आहे.

 Washington based Microsoft overtook Apple as the world most valuable company
YouTube India : आई-मुलाच्या 'तशा' व्हिडिओंमुळे NCPCR भडकले, यूट्यूब इंडियाला पॉक्सोचं उल्लंघन केल्याबद्दल पाठवली नोटीस

२०२१ नंतर Apple कंपनीचे बाजार मूल्य पहिल्यांदाच कमी झाले आहेत. कंपनीच्या बाजार मुल्यात ०.९ टक्क्यांची घट झालीये, त्यामुळे एकूण मूल्य २.८७१ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने वाढ नोंदवली आहे. त्यामुळे Apple ला धोबीपछाड करत मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात महागडी कंपनी ठरलीये. ही वाढ तात्पूरती असू शकते असं तज्त्रांचं मत आहे.

मायक्रोसॉफ्ट ही Apple पेक्षा अधिक गतीने वाढत आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट पहिल्या क्रमांकावर येईल अशीच शक्यता होती. मायक्रोसॉफ्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. याचा फायदा कंपनीला होत आहे, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञ गील लुरिया यांनी दिली.

 Washington based Microsoft overtook Apple as the world most valuable company
India targets Apple : हॅकिंगच्या आरोपांनंतर मोदी सरकारने आणला होता अ‍ॅपल कंपनीवर दबाव; खळबळजनक रिपोर्ट समोर

Apple समोरील आव्हाने कोणती?

चायनीज मार्केटमध्ये Apple कंपनीला धक्का बसताना दिसत आहे. चीनकडून Apple ला कमी रेटिंग दिली जात आहे. हवाईकडून असलेली स्पर्धा आणि अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अशी कृती केली जात आहे. शिवाय गुगलला डिफॉल्ट सर्च इंजिन करण्यासाठी दबाव वाढत असल्याने त्याचा परिणाम Apple वर पडत आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com