Airtel Xstream Box: फक्त १५०० रुपयात तुमचा जुना टीव्ही होईल 'स्मार्ट', जाणून घ्या कसे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TV

Airtel Xstream Box: फक्त १५०० रुपयात तुमचा जुना टीव्ही होईल 'स्मार्ट', जाणून घ्या कसे?

Airtel Xstream Box Details: सध्या स्मार्ट टीव्ही खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहेत. मात्र, तुमच्याकडे अद्यापही साधा टीव्ही असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही अवघ्या १५०० रुपयात जुन्या टीव्हीला स्मार्ट बनवू शकता. Airtel India ने यासाठी खास ऑफरची घोषणा केली आहे.

सध्या स्मार्ट टीव्ही प्रत्येक घरात पाहायला मिळतो. OTT प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यासाठी टीव्ही स्मार्ट असणे गरजेचे आहे. मात्र, साध्या टीव्हीवर OTT प्लॅटफॉर्म्सचा वापर करता येत नाही. अशावेळी तुम्ही Airtel Digital TV च्या Xstream Box ची मदत घेऊ शकता. Xstream Box च्या मदतीने तुमचा जुना टीव्ही सहज स्मार्ट टीव्हीत बदलेल. अशाप्रकारे, तुम्ही साध्या टीव्हीवरच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील चित्रपट, वेब सीरिज पाहू शकता.

हेही वाचा: Car price hike: नववर्षात कार खरेदी करण्याचा विचार आहे? खिशावर पडणार अतिरिक्त भार, कंपन्यांचा मोठा निर्णय

१५०० रुपयात मिळेल Airtel Xstream Box

Airtel Xstream Box साठी तुम्हाला १५०० रुपयात उपलब्ध आहे. या बॉक्सची मूळ किंमत २६५० रुपये आहे. परंतु, कंपनी नवीन वर्षाच्या निमित्ताने खास डिस्काउंट देत आहे. तुम्ही एअरटेलच्या इतर सर्व्हिससोबत देखील या ऑफरचा फायदा घेऊ शकता.

हेही वाचा: Recharge Plans: Jio चा शानदार प्लॅन, एकाच रिचार्जमध्ये ४ लोकांना मिळेल डेटा-कॉलिंगचा फायदा; Amazon-Netflix फ्री

Xstream Box च्या टॉप फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ५०० पेक्षा अधिक अ‍ॅप्स, बिल्ट-इन क्रोमकास्ट, ५०० पेक्षा अधिक टीव्ही चॅनेल्स, गुगल असिस्टेंट सर्च आणि Android TV 9 देण्यात आले आहे. Xstream Box ;च्या मदतीने तुम्ही ४के रिझॉल्यूशनमध्ये चित्रपट, सीरिज पाहू शकता.

एअरटेलच्या या Xstream Box ला तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. सेटअप बॉक्ससह मिळणाऱ्या रिमोटमध्ये मल्टीपल ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी बटनं देखील मिळतील.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

टॅग्स :Airteltv