
Buy e-SIM: ई-सिम बाबत भारतातील एक चांगली गोष्ट म्हणजे Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने ई-सिम सेवा देणे सुरू केले आहे. आज आम्ही तुम्हाला eSIM म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटेही याची सविस्तर माहिती देणार आहोत.
गेल्या काही दिवसापासून ई-सिम वर बरीच चर्चा सुरु आहे. त्यात Apple iPhone 14 मध्ये फिजिकल सिमऐवजी कंपनीने फक्त e-SIM चा पर्याय दिला आहे. पण, ई-सिम असलेले मॉडेल सध्या फक्त यूएसमध्ये विकले जाणार आहेत.
मुळात ई-सिम ही संकल्पना नवीन नाही. आतापर्यंत अनेक फोनमध्ये हे फीचर आले आहे. परंतु, सध्या ही सेवा फक्त त्या फोनमध्ये उपलब्ध आहे , ज्यात किमान एक फिजिकल सिम आहे. म्हणजेच, ड्युअल सिम फोन. ज्यामध्ये किमान एक फिजिकल सिम देण्यात आले आहे. पण, फिजिकल सिम सिस्टम i Phione द्वारे काढून टाकण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, ई-सिम काय आहे आणि ते नक्की कसे काम करते ? हा एक मोठा प्रश्न युजर्ससमोर आहे. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
eSIM म्हणजे काय?
eSIM सिमच्या नावावरूनच कळतं की हे एक वर्चुअल सिम आहे. या सिमला आपण डोळ्यानी पाहू नाही शकत कारण ते हार्डवेअर किंवा मदरबोर्डवर बसवलेले असते. एलटीई व्हेरियंटमध्ये येणाऱ्या स्मार्टवॉचमध्येही असे फीचर्स पाहता येतील. हे सिम काढता येत नाही. आपल्या जुन्या ट्रेडिशनल सिम कार्डवर काही घटक दिसतात, जे फोनच्या अंतर्गत घटकांशी कनेक्ट केल्यानंतरच काम करतात. हे एका विशेष आयडी अंतर्गत दूरसंचार नेटवर्कशी कनेक्ट होण्यास मदत करते. फोनवर फक्त सिमच्या मदतीने मेसेज आणि कॉल्स येतात.
eSIMs चे काय आहेत फायदे?
जे लोक सतत सिम कार्ड बदलत नाहीत त्यांच्यासाठी eSIM हे खूप फायदेशीर ठरते. हे सिम एकदा का तुमच्या स्मार्टफोनमध्ये टाकले तर तुम्ही मग बिनधास्त होऊन जाऊ शकति. या ई-सिममध्ये अनेक प्रोफाईल सेव्ह केले जाऊ शकतात, तसेच याचा आणखी एक फायदा म्हणजे आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलो तर ते आपोआप शहरानुसार प्रोफाइल बदलू शकते.
eSIM सिम तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा अधिक मजबूत करते.
तुम्ही जर का तुमच्या स्मार्टफोनमध्ये eSIM चा वापर केला असेल आणि जर तो फोन हरवला तर त्याचा डेटा लॉक उघडल्याशिवाय सहज काढता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा हरवलेला स्मार्टफोन हा सहजपणे ट्रैक करू शकतो.
आता बघू या eSIMs चे नुकसान काय आहे?
समजा एखाद्या वेळेला जर तुमचा स्मार्टफोन अचानक बंद पडला, तर तुम्हाला त्या मोबाईल मधले eSIMs सिम काढून इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये टाकता येणार नाही.
आपल्या साध्या सिमकार्ड एक फायदा असा की , फोन खराब झाल्यास, तुम्ही ते सिम काढून सहजपणे दुसऱ्या फोनमध्ये टाकू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.