WhatsApp वर बिनकामाचे मेसेज करणाऱ्यांचा होणार बंदोबस्त; लाँच होतंय नवं फीचर

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

प्रसिध्द मेसेंजिग ऍप Whatsappने मागील काही दिवसांत बरीच नवीन फिचर्स लाँच केली आहेत.

नवी दिल्ली: प्रसिध्द मेसेंजिग ऍप Whatsappने मागील काही दिवसांत बरीच नवीन फिचर्स लाँच केली आहेत. आता त्यांची टेस्टींगही सुरु आहे. ओव्हरऑल युजर्संचा Whatsapp वापराचा अनुभव चांगला करण्यासाठी Archived Chats चा नवीन वर्जन 'Read Later' या नावाने नवीन फिचर येत आहे. या फिचरचा यूजर्संना मोठा फायदा होणार आहे. 

Whatsappमध्ये येत असलेले  Read Later ऑप्शन काय आहे, त्याचा कसा फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती काही लवकरच समजेल. यूजर्स काही मोजक्या कॉन्टॅक्टला Read Later चा ऑप्शन सिलेक्ट करु शकतील. सध्या Whatsapp वर  फेसबूकची मालकी आहे. 

खुशखबर! PUBGचं भारतात 'कमिंग सून', सोशल मीडियावर टिझर लाँच

Read Later फिचरच्या साहाय्याने युजर्स काही चॅटना वाटेल तेंव्हा  mute करता येईल. रिपोर्टच्या माहितीनुसार हे फिचर बऱ्याच अंशी Vacation Mode सारखं काम करणार आहे. ज्यावर कंपनी बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. सध्याचा  Archived Chat ऑप्शन आणि या नव्या फिचरमध्ये मोठा फरक असून Read Laterमध्ये कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर नवीन मेसेजचं नोटिफिकेशन येणार नाही. तर दुसऱ्या बाजूला चॅट आर्काइव केल्यावर नवीन मेसेज आल्यावर त्याचं नोटिफिकेशन येतं.

OnePlus ते Samsung चे 12GB रॅम असलेले सर्वोत्तम स्मार्टफोन

कसं काम करेल Read Later?
जर तुम्हाला एखाद्याचे मेसेज वाचायचे नसतील आणि चॅटींगही करायची नसेल तर तुम्हाला तो नंबर  Read Later मध्ये ऍड करावा लागेल. त्यानंतर त्या नंबरची कसलीही नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही. या नवीन फिचरमुळे यूजर्संना अनावश्यक मेसेज टाळता येणार आहेत. Read Later हा ऑप्शन यूजर्स कधीही इनेबल आणि डिसेबल करु शकतील. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp new feature for unwanted Messages by different contacts

Tags
टॉपिकस
Topic Tags: