
WhatsApp: व्हॉट्सअॅपने आणले सर्वात भन्नाट फीचर, इंटरनेटशिवाय करा कोणाशीही चॅट; पाहा डिटेल्स
WhatsApp New Features: इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp यूजर्सला शानदार चॅटिंग एक्सपीरियन्स देण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असते. आता कंपनी यूजर्ससाठी एक हटके फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यूजर्ससाठी प्रॉक्सी सपोर्ट (Proxy Support) फीचर लाँच केले आहे. प्रॉक्सी सपोर्टद्वारे यूजर्स इंटरनेटशिवाय WhatsApp वापरू शकतात. विना इंटरनेटचे मित्र-मैत्रिणींशी सहज चॅट करता येईल.
इंटरनेटशिवाय वापरता येईल WhatsApp
यूजर्स आता इंटरनेटशिवाय या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. तुम्ही जर इंटरनेट नसलेल्या भागात राहत असाल तर अशावेळी हे फीचर खूपच कामी येईल. WhatsApp च्या या फीचरच्या मदतीने यूजर जगभरातील संस्था आणि वॉलंटियर्सच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपशी कनेक्ट राहू शकतात.
हेही वाचा: Twitter: मस्क आल्यापासून ट्विटरला लागलं ग्रहण, 20 कोटी यूजर्सचा डेटा; तुमचे अकाउंट असेल तर सावधान
WhatsApp ने ट्वीट करत माहिती दिली की, आम्ही स्वतंत्रपणे आणि खासगीरित्या संवाद साधण्यासाठी तुमच्यासोबत आहोत. WhatsApp शी थेट कनेक्ट होता येत नसल्यास तुम्ही वॉलंटियर्स आणि ऑर्गेनाइजेशन्सच्या सर्व्हरद्वारे जगाशी कनेक्ट राहू शकता.
एक अन्य ट्वीटमध्ये WhatsApp ने सांगितले की, WhatsApp तुमच्या देशात ब्लॉक झालेले असल्यास तुम्ही प्रॉक्सीचा वापर करून मित्र-मैत्रिणींशी चॅट करू शकता. प्रॉक्सीद्वारे WhatsApp शी कनेक्ट झाल्यावर खासगी मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्शनने सुरक्षित राहतील.
हे नवीन फीचर यूजरला WhatsApp चे सेटिंग मेन्यूमध्येच मिळेल. यासाठी फोनमध्ये अॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे गरजेचे आहे.
हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड