तुमची खासगी माहिती तर लीक झाली नाही ना? 'या' सोप्या स्टेप्सने घ्या जाणून | WhatsApp data breach | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp Data

WhatsApp data breach: तुमची खासगी माहिती तर लीक झाली नाही ना? 'या' सोप्या स्टेप्सने घ्या जाणून

WhatsApp Users Data Leaked: जवळपास ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. हॅकिंग कम्यूनिटी फोर्मने ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सचे फोन नंबर्स विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. रिपोर्टनुसार, हॅकर्सने या व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या फोन नंबरच्या विक्रीसाठी ऑनलाईन जाहिरात देखील पोस्ट केली आहे.

या डेटा बेसमध्ये जवळपास ८४ देशातील यूजर्सचा समावेश आहे. भारतासह ब्रिटन, अमेरिका, रशिया, इजिप्त, इटली आणि सौदी अरेबिया या देशातील यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

तुम्हाला देखील तुमची खासगी माहिती अथवा व्हॉट्सअ‍ॅप डेटा लीक झाला आहे, असे वाटत असल्यास तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने याबाबत जाणून घेऊ शकता.

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात प्रथम www.cybernews.com या वेबसाइटला भेट द्या.

  • येथे तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी टाका.

  • पुढे 'Check now' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा डेटा लीक झाला आहे की नाही याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

हेही वाचा: WhatsApp Update: मेसेज टू योरसेल्फ! भारतीयांसाठी WhatsApp घेऊन येणार नवं फीचर...

दरम्यान, जगभरातील जवळपास २ बिलियन लोकं इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. हॅकर्सने लीक झालेल्या डेटामध्ये कोणत्या देशातील नागरिकांचा समावेश आहे, याचीही माहिती दिली आहे. या डेटामध्ये अमेरिकेतील जवळपास ३२ मिलियन यूजर्सचा समावेश आहे.

तसेच, इटलीमधील २९ मिलियन, सौदी अरेबियातील २९ मिलियन, फ्रान्समधील २० मिलियन आणि तुर्कस्तानमधील २० मिलियन यूजर्सचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय, ब्रिटनमधील ११ मिलियन आणि रशियाच्या १० मिलियन यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर्स विक्रीसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :TechnologyWhatsapp backup