
लॉचिंगपासूनच व्हॉट्सअॅप आपल्या यूझर्संना चांगला चॅटिंग अनुभव देण्यासाठी नवे-नवे फिचर्स घेऊन येत आहे.
नवी दिल्ली- WhatsApp जगातील कोट्यवधी युझर्स वापरतात. लॉचिंगपासूनच व्हॉट्सअॅप आपल्या यूझर्संना चांगला चॅटिंग अनुभव देण्यासाठी नवे-नवे फिचर्स घेऊन येत आहे. आता 2021 मध्येही WhatsApp अनेक नवीन फिचर्स घेऊन येणार आहे. यात कोणत्या फिचर्सचा समावेश असेल हे आपण बघुया..
मल्टी-डिवाईस सपोर्ट
मल्टी-डिवाईस सपोर्ट फिचरची अनेक युझर्स वाट पाहात आहे. हे फिचर आल्यानंतर यूझर्स आपले अकाऊंट चार वेगवेगळ्या डिवाईसवर ऑपरेट करु शकेल. सध्या यूझर्स आपले अकाऊंट केवळ मोबाईल आणि डेस्कटॉपवरच वापरु शकतात. नोव्हेंबर 2019 मध्ये या फिचरचे बीटा व्हर्जन आयफोनवर आणण्यात आले होते.
धक्कादायक! भारतातील 10 कोटी क्रेडिट,डेबिट कार्डधारकांचा डेटा लीक; डार्क वेबवर...
वॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप ऍपवरुन कॉलिंग
यूझरसाठी हे फिचर बऱ्याच कामाला येणार आहे. या फिचरची कोट्यवधी यूझर्स वाट पाहात आहेत. चर्चा आहे ती कंपनी यावर्षी विडोंज आणि मेक ओएससाठी वॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट रोलआऊट करणार आहे. कॉलिंगसाठी यूझर्संना सध्या मोबाईलचा वापर करावा लागतो.
सॅमसंग आणतंय स्वस्तातले फोन; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स
WhatsApp विमा
पेमेंट सर्विसला लाँच केल्यानंतर आता WhatsApp आपल्या यूझर्ससाठी यावर्षी insurance सर्विस घेऊन येणार आहे. ही सर्विस कंपनी एसबीआय आणि एचडीएफसी बँकेसोबत पार्टनरशीप ऑफर करेल.
रीड लेटर
रीड लेटर सध्याच्या अर्काईव्ह चॅट्समध्ये अपग्रेटेड वर्जन असेल. कोणत्याही चॅटला रीड लेटरमध्ये मूव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये नोटिफिकेशन्स येणार नाहीत. यासोबत यूझर्संना व्हॅकेशन मोडचे फिचरही देण्यात येईल. रीड लेटरमध्ये सेटिंग्सला कस्टमाईज करण्यासाठी एडिट बटनही देण्यात येईल.