WhatsAppची मोठी कारवाई; भारतातील 16.6 लाखांहून अधिक खाती बॅन; जाणून घ्या कारण

व्हॉट्सअ‍ॅपने एप्रिल महिन्यात भारतातील तब्बल 16.6 लाखांहून अधिक खाती बॅन केली आहेत.
WhatsApp Accounts Ban
WhatsApp Accounts BanSakal

व्हॉट्सअ‍ॅप आता लोकांच्या जीवनाचा भाग बनला आहे. भारतातही व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. परंतु फेक अकाउंट वापरणाऱ्यांची किंवा अकाउंटचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. नवीन आयटी नियम 2021नुसार व्हॉट्सअ‍ॅपने एप्रिल महिन्यात भारतातील तब्बल 16.6 लाखांहून अधिक खाती बॅन केली आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने मार्चमध्येसुद्धा देशातील 18 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली होती. परंतु कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर बंदी का घातली? जाणून घेऊया. (More than 16.6 lakh accounts banned by WhatsApp in India)

WhatsApp Accounts Ban
स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असतानाही पाठवा WhatsApp मेसेज, जाणून घ्या कसे

व्हॉट्सअ‍ॅपला एप्रिलमध्ये देशभरातून 844 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि यापैकी 123 खाती कारवाईयोग्य होती. तर, मार्चमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपला 597 तक्रार अहवाल आणि 74 कार्रवाईयोग्य खाती सापडली.

व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "या युजर्स सेफ्टी रिपोर्टमध्ये अर्थात वापरकर्ते सुरक्षा अहवालात वापरकर्त्याच्या तक्रारींसह आणि व्हॉट्सअ‍ॅपने केलेल्या कारवाईचा तपशील दिला गेला आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात व्हॉट्सअॅपने 1.6 दशलक्षाहून अधिक खाती बॅन केल्याचं सांगितले आहे.

कंपनीने म्हटले आहे की, शेअर केलेल्या डेटामध्ये 1 ते 30 एप्रिल दरम्यान WhatsApp द्वारे बंदी घालण्यात आलेल्या भारतीय खात्यांची संख्या हायलाइट करण्यात आली आहे, ज्यामध्ये युजर्सनी 'रिपोर्ट' फिचरद्वारे मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रियांच्या आधारेही ही कारवाई केली आहे.

WhatsApp Accounts Ban
WhatsApp यूजर्ससाठी आजपासून नवीन फीचर; Mark Zuckerberg म्हणाले..

वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी गुंतवणूक-

"गेल्या काही वर्षांपासून, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट आणि तज्ञ तसेच प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे," असं कंपनीने म्हटले आहे.

नवीन नियम काय म्हणतो?

नवीन IT नियम 2021 अंतर्गत, 5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मासिक अहवाल प्रकाशित करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com