iPhone 14 : भारतात iPhone एवढे महाग असण्याला सरकार जबाबदार?

Apple ने बुधवारी फार आउट इव्हेंटमध्ये लेटेस्ट Apple Watch 8 आणि AirPods Pro 2 इयरबड्ससह iPhone 14 सिरीज स्मार्टफोन लॉन्च केले.
iPhone 14
iPhone 14 esakal

Apple ने बुधवारी फार आउट इव्हेंटमध्ये लेटेस्ट Apple Watch 8 आणि AirPods Pro 2 इयरबड्ससह iPhone 14 सिरीज स्मार्टफोन लॉन्च केले. भारतातील त्याची किंमत देखील समोर आली आहे. अमेरिका आणि भारतातील आयफोनच्या किमतीत मोठी तफावत आहे. भारतात iPhone का महाग आहे याबद्दल जाणून घेऊया.

iPhone 14
Apple आणि Pornhub मध्ये आहे खास कनेक्शन! जाणून घ्या...

iPhone 14 आणि iPhone 14 Plus ची भारतात किंमत

भारतात नवीन iPhone 14 ची किंमत 79,900 रुपये आहे. तर iPhone 14 plus ची किंमत 89,900 रुपये आहे. iPhone 14 साठी प्री-बुकींग 9 सप्टेंबरपासून सुरू होईल. iPhone 14 ची विक्री 16 सप्टेंबरपासून तर iPhone 14 Plus ची विक्री 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यूएस मध्ये iPhone 14 ची किंमत $799 (अंदाजे 63,700 रुपये) इतकी असेल. तर iPhone 14 Plus ची किंमत $899 (अंदाजे रु. 71,600) आहे. आयफोन मॉडेलच्या किंमतीत 40,000 रुपयांचा फरक आहे.

iPhone 14
Apple Event 2022 : iPhone 14, वॉच सीरीज 8 सह अनेक प्रॉडक्ट लॉन्च

भारतात iPhone चे मॉडेल्स महाग का ?

इतर देशांच्या तुलनेत भारतात आयफोन मॉडेल्सची किंमत ४० टक्क्यांपर्यंत जास्त आहे. आयफोनवरील आयात शुल्क, १८ टक्के जीएसटी, इतर शुल्क आणि कंपनीचा स्वतःचा नफा यामूळे भारतातत iPhone महाग आहेत, असे मत, तज्ञांनी व्यक्त केले. म्हणजेच सरकारने लादलेल्या अतिरीक्त करमुळे भारतात आयफोनला जास्त किंमत मोजावी लागत आहे.

iPhone 14
Apple watch 8 Series : तापमान सेन्सरसह मिळतं बरंच काही, जाणून घ्या किंमत

सरकारची इच्छा आहे की, परदेशी कंपन्यांनी त्यांचे प्रोडक्ट भारतातच मॅन्युफॅक्चरिंग करावीत. तयार प्रोडक्टच्या तुलनेत त्यांच्या पार्टवर कमी आयात शुल्क आकर्षित करतात, ज्यामुळे अनेक परदेशी कंपन्या भारतात त्यांचे फोन बनवत आहेत.

iPhone 14
Apple Event 2022 : iPhone 14, वॉच सीरीज 8 सह अनेक प्रॉडक्ट लॉन्च

कोणते आहेत Apple चे लेटेस्ट स्मार्टफोन

Apple च्या लेटेस्ट स्मार्टफोन सीरिजमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे . iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. iPhone 14 Plus मध्ये एक मोठा OLED डिस्प्ले आणि 24 तास बॅटरी लाईफ आहे. लेटेस्ट iPhones सॅटलाईट इमरजंसी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसह येतात. ज्याचा उपयोग सॅटलाईटसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी केला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com