
Whatsapp Feature : तुमची गर्लफ्रेंड व्हॉट्सअॅपवर कोणाशी जास्त बोलते? व्हॉट्सअॅपच सांगेल तुमचं सीक्रेट, वाचा
WhatsApp Feature : आपण अनेक वर्षांपासून व्हॉट्सअॅप वापरत आहोत, पण त्यावर असे अनेक फिचर्स आहेत, जे अनेकांना माहीत नसतील. व्हॉट्सअॅप आपल्या सर्वांसाठी अत्यावश्यक बनले आहे आणि त्याशिवाय जगण्याची कल्पना देखील अनेकांना कठीण झालेय.
दिवसभर व्हॉट्सअॅपवर लोकांशी इतक्या गप्पा होतात की आपण कोणाशी जास्त बोलतो हे सांगताही येत नाही. तेव्हा तुमची गर्लफ्रेंड कोणाशी जास्त बोलतेय हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर या सोप्या ट्रिक्स जाणून घ्या.
अनेक वेळा आपण आपल्या घरात पाहतो की आपला जोडीदार (प्रेयसी किंवा प्रियकर किंवा नवरा किंवा पत्नी) दिवसभर फोनवर असतो.
मित्रांचेच उदाहरण घ्या, जे सर्वांच्या मध्ये असताना फोनवर बोलत राहतात. अशा वेळी अनेकवेळा मनात येतं की, तो फोनमध्ये काय पाहतो, किंवा तो व्हॉट्सअॅपवर कोणाशी सर्वाधिक चॅट करतो.

WhatsApp Chatting
हे जाणून घ्यायचं असेल तर व्हॉट्सअॅपवर एक सेटिंग आहे, ज्याद्वारे हे तपासले जाऊ शकते की व्हॉट्सअॅपवर कोणत्या चॅटमध्ये जास्तीत जास्त चॅटिंग झाली आहेत. चला तर स्टेप्स जाणून घेऊया.
स्टेप 1- सर्व प्रथम WhatsApp उघडा.
स्टेप 2- नंतर सेटिंग्जवर टॅप करा.
स्टेप 3 - नंतर डेटा आणि स्टोरेज यूजवर जा.
स्टेप 4 - तुम्ही डेटा आणि स्टोरेज वापरावर क्लिक करताच, तुम्ही चॅट लिस्ट पाहू शकता. यामध्ये तुम्ही मोबाईलचा जास्तीत जास्त डेटा कुठे खर्च केलाय हे रँकिंगनुसार तुम्हाला दिसेल.
उदाहरणार्थ, पहिली चॅट बघून, जास्तीत जास्त किती चॅट्स झाल्या हे समजेल कारण त्याद्वारे वापरण्यात आलेला डेटा तुमच्या समोर चॅटच्या खाली लिहिला जाईल.
स्टेप 5 - युजरच्या नावावर क्लिक करून तुम्ही युजरसह शेअर केलेला टेक्स्ट, स्टिकर्स, फोटो, व्हिडिओंची संख्या देखील जाणून घेऊ शकता.
स्टेप 6 - येथून तुम्ही स्टोरेज क्लिअर करू शकता आणि स्पेस वाचवू शकता.
हे फिचर यासाठी दिले गेले आहे जेणेकरून स्टोरेज मॅनेत करता येईल. मात्र, येथून सर्वाधिक चॅटींग कोणासोबत आहे हेही कळते.