USE Signal; जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं सांगितला WhatsApp ला पर्याय

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

अटी  मान्य करा नाहीतर अ‍ॅप वापरता येणार नाही असा मेसेज दिल्यानं युजर्सनी आता व्हॉटसअ‍ॅपला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. 

सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे आता जगभरात त्याला पर्यायी अ‍ॅप शोधण्यात येत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी एक अ‍ॅप सुचवलं असून सिग्नल अ‍ॅप वापरा असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर सिग्नल ट्रेंडमध्ये आहे. 

व्हॉटसअ‍ॅपने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केला आहे. याचं नोटिफिकेशन युजर्सना देण्यात आलं असून त्यात अटी  मान्य करा नाहीतर अ‍ॅप वापरता येणार नाही असा मेसेज दिल्यानं युजर्सनी आता व्हॉटसअ‍ॅपला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. 

हे वाचा - डोन्ट वरी, आता WhatsApp मधल्या तुमच्या विशिष्ट खाजगी चॅटला असे लावा लॉक

युजर्स आता इन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅफ सिग्नलचा वापर करण्याकडे वळले आहेत. अचानक सिग्नल अ‍ॅपच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली असून सर्वात श्रीमंत व्यक्ती अ‍ॅलन मस्क यांनीही ट्विटरवर USE सिग्नल असं म्हटलं आहे. इलॉन मस्क यांनी त्यांच्या चार कोटी फॉलोअर्सना या अ‍ॅपचा वापर करण्यास सांगितलं आहे. 

व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या अटी आणि नियम हे 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नव्या पॉलिसी लागू झाल्यानंतर युजर्सची प्रायव्हसी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या संख्येनं लोक चॅटिंग अ‍ॅपसाठी पर्याय शोधत आहेत. यातच टेलिग्रामसारखा पर्यायही सध्या वापरला जात आहे. वेबसिरीज, मुव्हीज इत्यादी डाउनलोड कऱण्यासाठी याचा वापर कऱणाऱ्यांची संख्या आधीपासूनच खूप आहे. त्यात आता आणखी नवीन युजर्स याकडे वळले आहेत. 

हे वाचा - Agree Or Not Now; तुम्हालाही Whatsapp नोटिफिकेशन आलंय का? |

सध्या या अ‍ॅपचे 1 कोटीहून अधिक युजर्स आहेत. सिग्नल प्रायव्हेट मेसेंजर अ‍ॅपने व्हॉटसअ‍ॅप युजर्सच्या नाराजीची संधी साधत लोकांना त्यांच्याकडे आकर्षित कऱण्यासाठी गाइडलाइन जारी केल्या आहेत. कंपनीने युजर्सना सांगितलं आहे की, सर्वात आधी युजर्सना सिग्नल अ‍ॅपवर एक ग्रुप तयार करावा लागेल. त्यानंतर ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन ग्रुप लिंकवर क्लिक करावं लागेल.

हे वाचा - फेसबुकने Like बटण हटवलं; पब्लिक पेजच्या डिझाइनमध्ये केला बदल

ग्रुप लिंक तयार करण्यासाठी टॉगल ऑन करा आणि शेअर पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. यात कोणत्याही जुन्या अ‍ॅपवर लिंक शेअर करून इतर लोकांना या लिंकवर पोहोचता येतं. त्यामुळे तुमच्या फ्रेंडलिस्टमधील लोकही या अ‍ॅपवर येऊ शकतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world richest men says use signal after whatsapp change privacy policy