esakal | लॉंच होण्याआधीच Redmi K50 Pro + चे स्पेसिफिकेशन लीक, पाहा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi K50 Pro +

लॉंच होण्याआधीच Redmi K50 Pro + चे स्पेसिफिकेशन लीक, पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

शाओमी कंपनी त्यांचा स्मार्टफोन Redmi K40 चे अपग्रेडेड व्हर्जन Redmi K50 Pro+ लाँच करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, चीनमधील एका टेक टिपस्टरने या स्मार्टफोनचे काही फीचर्स उघड केली आहेत. मात्र Redmi K50 Pro Plus स्मार्टफोनच्या लॉन्च, किंमत किंवा स्पेसिफिकेशनबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

91Mobiles च्या रिपोर्टनुसार, टेक टिपस्टरने दावा केला आहे की Redmi K50 Pro + स्मार्टफोन AMOLED पॅनलसह येईल. त्याच्या फ्रंटला पंच-होल कॅमेरा दिला जाईल आणि त्याला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल. याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

108MP कॅमेरा देण्यात येईल?

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, 108MP लेन्स असलेल्या Redmi K50 Pro + स्मार्टफोनमध्ये पेरिस्कोप लेन्स आणि डेप्थ सेन्सर दिले जाऊ शकतात. या फोनला 32 एमपी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय फारशी माहिती मिळाली नाही.

Redmi K50 Pro+ लाँच आणि किंमत (अपेक्षित)

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Redmi K50 Pro + स्मार्टफोन पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या आगामी फोनची किंमत प्रीमियम रेंजमध्ये ठेवली जाईल.

हेही वाचा: BSNLचा दमदार प्लॅन, मिळेल 2000GB डेटा, अनलिमीटेड कॉलिंगसह बरंच काही

Redmi K40 स्मार्टफोन या वर्षी फेब्रुवारी मध्ये लाँच झाला होता. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंच HD प्लस AMOLED डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आणि 4,520mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच त्याची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला, ज्यात 48MP प्राइमरी सेंसर, 8MP वाइड एंगल लेन्स आणि 5MP मॅक्रो लेन्स आहेत. तर सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 20MP कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच रेडमी के 40 मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.1, GPS आणि USB Type-C पोर्ट सपोर्ट दिला आहे.

हेही वाचा: Motorolaचे दोन नवे स्मार्टफोन लॉंच, स्वस्तात मिळतील दमदार फीचर्स

loading image
go to top