Xiaomi : तुमच्याकडेही आहे श्याओमीचा फोन? आता करता येणार नाही 'हे' काम.. महत्त्वाचं फीचर झालं बंद!

YouTube Premium : आपल्या सबस्क्रिप्शनची संख्या वाढावी यासाठी यूट्यूब कित्येक थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर कारवाई करत आहे.
Xiaomi YouTube Video
Xiaomi YouTube VideoeSakal

Xiaomi YouTube Video Feature : जर तुमच्याकडेही श्याओमीचा फोन असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे श्याओमी फोनमधील महत्त्वाचे फीचर्स आता बंद होणार आहेत. यातील मुख्य फीचर म्हणजे यूट्यूब व्हिडिओ बॅकग्राउंडला पाहणे. केवळ श्याओमीच्या फोनमध्ये हे फीचर मिळत होतं. मात्र आता हे बंद होणार आहे. (YouTube Background Video Feature)

यूट्यूबवर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहत असताना होम बटण दाबल्यानंतर व्हिडिओ पॉझ होतो. तुम्हाला जर यूट्यूबवर गाणी ऐकायची असतील तर स्क्रीन कायम सुरूच ठेवावी लागते. यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर या दोन्ही गोष्टींवर उपाय मिळतो. आतापर्यंत श्याओमी यूजर्सना हे फीचर यूट्यूब प्रीमियम न घेताही मिळत होतं. (YouTube Premium)

Xiaomiच्या हायपर ओएस आणि MIUI ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये हे फीचर मिळत होतं. मात्र आता यावर बंदी घालण्यात आली आहे. आपल्या सबस्क्रिप्शनची संख्या वाढावी यासाठी यूट्यूब कित्येक थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर (Third Party Apps) कारवाई करत आहे. याचाच भाग म्हणून आता श्याओमीलाही आपलं फीचर हटवावं लागलं आहे. (Xiaomi YouTube Feature)

Xiaomi YouTube Video
Xiaomi Car : 'अ‍ॅपल'च्या प्रोजेक्टला ब्रेक, पण श्याओमीने मारली बाजी! सादर केली 800 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार..

इतर फीचर्सही हटवले

श्याओमीच्या Hyper OS, MIUI 14, MIUI 13 आणि MIUI 12 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या मॉडेल्समध्ये व्हिडिओ टूलबॉक्स आणि गेम टूलबॉक्सचे फीचर्स हटवले आहेत. गेम टूलबॉक्समध्येही टर्न-ऑफ-स्क्रीन हे फीचर हटवण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com