बाजारात येतेय ‘E०१’ इलेक्ट्रिक स्कूटर; हे असणार फिचर्स

बाजारात येतेय ‘E०१’ इलेक्ट्रिक स्कूटर; हे असणार फिचर्स

नागपूर : दिवसेंदिवस प्रदूषण चांगलेच वाढत चालले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेणेही कठीण होत आहे. यात गाड्यांपासून होणाऱ्या प्रदूषणामुळे चांगलीच वाढ होत आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढणाऱ्या गाड्यांमुळे प्रदूषणात वाढ झाली. यामुळेच इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी जोर धरत आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही आहे. आता यामाहानेही इलेक्ट्रिक गाडी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर जाणून घेऊया या गाडीविषयी... (Yamaha-launches-E01-electric-scooter)

जपानची अग्रगण्य दुचाकी निर्माता यामाहा इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी एक असेल. ही स्कूटर २०१९च्या ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर आता ही स्कूटर २०२१ मध्ये लॉन्च करण्याची योजना सुरू आहे. यामाहा E०१ असे इलेक्ट्रिक स्कूटर असे नाव आहे.

बाजारात येतेय ‘E०१’ इलेक्ट्रिक स्कूटर; हे असणार फिचर्स
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

कंपनीने या स्कूटरच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. कंपनी आपली १२५ सीसी स्कूटरच्या जागी ही स्कूटर बाजारात आणेल. तुम्ही यामाहा E०१ इलेक्ट्रिक स्कूटरचे फोटो पाहता तर रेसिंग स्पोर्ट्स बाईकची आठवण येईल. ही स्कूटर पूर्णपणे नवीन डिझाईन आणि वैशिष्ट्यांसह बाजारात येणार आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये १५ एचपीची इलेक्ट्रिक मोटर बसविली आहे. सोबतच नॉन रिमूवेवल लिथियम आयन बॅटरी आहे. याला फूट पॅनलच्या खाली संग्रहित केले आहे.

ई-स्कूटरच्या किमतीबद्दल अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, वैशिष्ट्य़े आणि वैशिष्ट्य़ांचा विचार केल्यास स्कूटर टीव्हीएसच्या आयक्यूब आणि एप्रिलियाच्या एसआरएक्स १२ ला कठोर स्पर्धा देणार आहे. स्कूटर प्रथम जपानमध्ये लाँच केली जाईल. भारतात त्याचे प्रक्षेपण करण्यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, असे मानले जाते की जपानमध्ये लॉँच झाल्यानंतर एका महिन्यातच भारतात लाँच करण्याचा विचार करण्यात येईल.

बाजारात येतेय ‘E०१’ इलेक्ट्रिक स्कूटर; हे असणार फिचर्स
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

खास वौषिष्ट म्हणजे बॉडी आणि डिझाइन

स्कूटरच्या पुढील भागात चार्जिंग स्लॉट दिला आहे. जो खूपच आकर्षक दिसत आहे. समोरची हेडलाईटसोबत एलईडी बसविलेली आहे. स्कूटरला मागून पाहिले असता ते रेसिंग ट्रॅकवर धावत असलेल्या रेसिंग बाईकचा लुक देते. स्कूटरची सर्वांत खास वौषिष्ट म्हणजे बॉडी आणि डिझाइन. इतर स्कूटरमध्ये एक फूट रेस्ट असते. मात्र, या गाडीत वेगळ फूट रेस्ट तयार करण्यात आल आहे. जे जमिनीला स्पर्श करणार नाही.

(Yamaha-launches-E01-electric-scooter)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com