
2021 मध्ये व्हॉट्सॲपने भारतात लॉंच केले 'हे' टॉप फीचर, पाहा यादी
WhatsApp Top Features 2021: आज जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये व्हॉट्सॲपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून केला जातो. आज WhatsApp चे तब्बल 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते जगभर आहेत. दरम्यान सर्व टेक कंपन्यांप्रमाणे WhatsApp ने देखील इयर एंड रिव्ह्यू 2021(Year End Review 2021) जारी केला. यामध्ये व्हॉट्सॲपने यावर्षी भारतात खास लॉंच केलेल्या सर्व फीचर्सची यादी जाहीर केली आहे.
कोरोना संकटात हेल्पलाईन
व्हॉट्सॲपसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून 2021 मध्ये, केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉट्सॲपचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला. भारतात 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये कोरोनाचा कहर जास्त होता. त्या संकटाच्या काळात लोकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी 15 राज्यांच्या सरकारकडून व्हॉट्सॲपवर कोविड-19 हेल्पलाइन सुरू करण्यात आली.
कोरोनाची लस बुक (Corona Vaccine) करण्यापासून ते लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination Certificate) डाउनलोड करण्यापर्यंतची सुविधा भारतात व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देण्यात आली होती. 2020 मध्ये केंद्र सरकारने WhatsApp वर MyGov कोरोना हेल्पडेस्क (Corona Help Desk) सुरू केला होचा. या हेल्पडेस्कवरून 55 मिलीयन लोकांपर्यंत माहिती पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 12 मिलीयन लसीकरण प्रमाणपत्रे डाउनलोड करण्यात आली आहेत.
इतर फीचर्स
2021 मध्ये वापरकर्त्यांसाठी WhatsApp ने अनेक भन्नाट फीचर्स लाँच केले गेले, 2021 मध्ये, WhatsApp ने डिफॉल्ट डिसअपेरिंग मेसेज, मेसेज लेव्हल, एखादा ठराविक मेसेज बद्दल तक्रार करणे आणि बॅकअप एन्क्रिप्शन यासह अनेक फीचर्स लॉन्च केली आहेत. याशिवाय, कंपनीने डेस्कटॉप व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री, मीडिया वेब एडिटर आणि स्टिकर यांसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
WhatsApp पेमेंट
व्हॉट्सॲप पेमेंटची सुविधा आधीपासून होती पण 2021 मध्ये त्यात अनेक नवीन अपडेट्स आले आहेत. सर्वात टॉप फीचर म्हणजे पेमेंट शॉर्टकट, जे सर्व वापरकर्त्यांनी अॅपमधिल चॅट बॉक्समध्ये डीफॉल्ट दिसते. कंपनीने पेमेंटसाठी स्टिकर्स आणि कॅशबॅक देखील ऑफर केला. आता WhatsApp ला पेमेंट सर्व्हिसेससाठी 40 मिलीयन युजर्सची परवानगी मिळाली आहे, जी पूर्वी 20 मिलीयन होती.
WhatsApp Business अपडेट
व्हॉट्सॲपने नुकतीच Uber सोबत भागीदारी जाहीर केली आहे, त्यानंतर उबर कॅब व्हॉट्सॲपवरून थेट बुक करता येणार आहे. यासाठी फोनवर उबर ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. उबेर व्यतिरिक्त, कंपनी भारत पेट्रोलियमसोबत भागीदारी करण्याबाबतही चर्चा करत आहे. तसेच गॅस कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. व्हॉट्सॲप बिझनेस ॲपच्या वापरकर्त्यांची संख्येंने भारतात 15 मिलीयनचा आकडा ओलांडला आहे.
मल्टी डिव्हाइस फीचर
या वर्षी लॉन्च झालेल्या व्हॉट्सॲपच्या या फीचरची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. या फीचरमुळे वापरकर्ते एकाच व्हॉट्सॲप खात्यावर एका पेक्षा जास्त डिव्हाइस व्हॉट्सॲप वापरू शकतात. या मध्ये तुम्हाला तुमच्या प्रायमरी अकाउंट लॉगआउट करण्याची आवश्यकता नाही.
मेक कॉल्स ऑन पीसी
व्हॉट्सॲपचे हे फिचर यावर्षी लॉन्च करण्यात आले. या फीचरच्या मदतीने, वापरकर्ते त्यांच्या PC वर WhatsApp वेबद्वारे सहज व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल करू शकतात. मात्र, हे फीचर आणण्यापूर्वी ही सुविधा फक्त फोनवरच मिळत होती.