Premium|Study Room : भगतसिंग: क्रांतीची ज्वाला आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रेरणादायी नायक

Bhagat Singh Biography : क्रांतिकारक भगतसिंगांचे विचार आणि बलिदान आजही भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या 'इंकलाब जिंदाबाद' या घोषणेने स्वातंत्र्यलढ्यात नवीन चैतन्य फुंकले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी फासावर जाणारा हा थोर विचारवंत क्रांतीचा महानायक ठरला.
Bhagat Singh Biography

Bhagat Singh Biography

esakal

Updated on

विपुल वाघमोडे

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, ज्यांनी आपल्या अल्पायुष्यातही राष्ट्राच्या चेतनेवर अमिट ठसा उमटवला. अशाच तेजस्वी क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. देशभक्ती, त्याग आणि क्रांतीची जाज्वल्य भावना यांचे प्रतीक असलेले भगतसिंग हे भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान बनले. ‘इंकलाब जिंदाबाद’ हा घोष भारतातील स्वातंत्र्यलढ्याचा प्रेरणादायी नारा ठरला आणि त्यामागे भगतसिंगांचे विचार आणि धैर्य दडलेले होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात विचारशील आणि वैचारिक क्रांतिकारकांपैकी एक म्हणजे भगतसिंग. त्यांना केवळ क्रांतिकारक म्हणून पाहणे अपूर्ण ठरेल. प्रत्यक्षात ते एक सखोल वाचन करणारे विचारवंत, समाजवादी दृष्टिकोन असलेले राजकीय कार्यकर्ते आणि आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पाहणारे तरुण होते. त्यांच्या विचारांची घडण अनेक जागतिक क्रांती, तत्त्वज्ञान आणि विशेषतः लेनिन यांच्या समाजवादी विचारसरणीमुळे झाली.

Bhagat Singh Biography
Premium|Study Room : २०२५ मध्ये भारताची परराष्ट्रनीती; संतुलन आणि स्वायत्तता
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com