

India’s Balancing Act in the New Cold War: Between Russia, the U.S. and China
E sakal
जगामध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील मतभेद केवळ युक्रेनमधील युद्धापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. या संघर्षाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजार, शस्त्रास्त्र स्पर्धा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये जाणवत आहे. अनेक तज्ज्ञ या वाढत्या तणावाला 'शीतयुद्ध २.०' असे म्हणू लागले आहेत. मात्र, हे आजचे शीतयुद्ध पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे आणि अनेक बाजूंनी पसरलेले आहे. हा केवळ विचारधारेचा संघर्ष नाही, तर तो आर्थिक, लष्करी आणि तांत्रिक वर्चस्व मिळवण्याचा एक मोठा खेळ आहे.