

ऑक्टोबर २०२५ चालू घडामोडी
ई सकाळ
ऑक्टोबर २०२५ महिन्यात भारताने उंटसंवर्धनासाठी राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम सुरू केला, कोपरगाव येथे सहकारी संस्थेद्वारे चालणारा पहिला बायोगॅस आणि पोटॅश प्रकल्प उभारला, तर नाशिकमध्ये नवी फिल्म सिटी आणि वेंगुर्ला येथे पाण्याखालील संग्रहालयाची घोषणा झाली. याचबरोबर ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त देशात राष्ट्रभावनेचा उत्सव साजरा झाला.
या अंकात भारताच्या विकासात्मक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घडामोडींसोबतच जागतिक क्रीडा आणि विज्ञानातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा आढावा घेतला आहे.
१. राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम
भारतामधील घटत्या उंटसंख्येवर उपाय म्हणून मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातर्फे राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम (National Camel Sustainability Initiative - NCSI) सुरू करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे देशातील घटती उंटसंख्या नियंत्रित करणे आणि उंटसंवर्धनाला चालना देणे.
सध्या भारतातील सुमारे ९० टक्के उंट राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये आढळतात.
२. मदरसा बोर्ड रद्द करणारे भारतातील पहिले राज्य - उत्तराखंड
मदरसा बोर्ड रद्द करणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे उत्तराखंड आहे.
या निर्णयासाठी राज्य सरकारने ‘उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षण विधेयक, २०२५’ मंजूर केले आहे.
या विधेयकाद्वारे मदरशांचे शिक्षण राज्याच्या सर्वसाधारण शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट केले जाणार असून, धर्मनिरपेक्ष आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अंमलबजावणी हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.