

Indian Economy GDP Growth Analysis
esakal
लेखक : श्रीकांत जाधव
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे आणि लवकरच ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या विकासाचा मुख्य मापदंड म्हणजे ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ अर्थात जीडीपी (GDP). जेव्हा-जेव्हा जीडीपीचे नवे आकडे जाहीर होतात, तेव्हा सरकार त्यावरून आपली पाठ थोपटून घेते, तर विरोधक आणि काही अर्थतज्ज्ञ या आकड्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
जीडीपी (Gross Domestic Product) म्हणजे एका ठराविक कालावधीत (सहसा एका वर्षात) देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण बाजारमूल्य. देशाची अर्थव्यवस्था किती वेगाने वाढत आहे किंवा तिची स्थिती काय आहे, हे समजण्यासाठी जीडीपी हा सर्वात महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. परंतु, ही मोजणी साधी-सोपी नसते. काळानुसार अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलते आणि त्यामुळे मोजणीच्या पद्धतीतही बदल करणे क्रमप्राप्त ठरते.
भारताच्या जीडीपी मोजणीच्या पद्धतीत अलीकडच्या काळात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून देशातील वाढत्या सेवा क्षेत्राचा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा अचूक अंदाज घेता येईल.