Premium|Study Room : यंदा धोक्याची घंटा! २०२६ मध्ये देशात सामान्यपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागाचा (IMD) मोठा अंदाज

IMD Monsoon Forecast India 2026 : भारत हवामानशास्त्र विभागाने (IMD) २०२६ च्या मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून, यावर्षी पाऊस सामान्यपेक्षा कमी म्हणजेच सरासरीच्या केवळ ९२ टक्के राहण्याची चिंताजनक शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD Monsoon Forecast India 2026

IMD Monsoon Forecast India 2026

esakal

Updated on

लेखक : सागर रेपाळे

भारत हवामानशास्त्र विभागाने (IMD) २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील एकूण पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. १९७१ ते २०२० या पन्नास वर्षांच्या दीर्घकालीन सरासरीनुसार (LPA) देशाचा सरासरी पाऊस ८७ सेंटीमीटर आहे. यावर्षी तो सरासरीच्या केवळ ९२ टक्के म्हणजेच साधारण ८० सेंटीमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

पाच श्रेणींमधील संभाव्यता

श्रेणी    पावसाची मर्यादा               अंदाजित शक्यता      सामान्य शक्यता

तुटवडा  LPA च्या ९०% पेक्षा कमी               ३५%   १६%

सामान्यपेक्षा कमी LPA च्या ९०-९५%              ३१%   १७%

सामान्य LPA च्या ९६-१०४%                    २७%   ३३%

सामान्यपेक्षा जास्त   LPA च्या १०५-११०%     ६%    १६%

अतिरिक्त       LPA च्या ११०% पेक्षा जास्त      १%     १७ %

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com