

India’s Internal Security in 2025: From Naxalism to Cyber Threats
E sakal
गौरव कुमार बाळे
१) २०२५ मध्ये नक्षलवादाचा प्रभाव जरी कमी झाला असला, तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. छत्तीसगडच्या बिजापूर व सुकमा जिल्ह्यांत सुरक्षा दलांवर आयईडी हल्ले आणि चकमकी घडल्या.
काही घटनांमध्ये जवानांना प्राण गमवावे लागले, ज्यामुळे नक्षलवादी अजूनही हिंसक क्षमतेत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच वेळी, C-60 कमांडो, CRPF व राज्य पोलीस यांच्या संयुक्त कारवायांमुळे अनेक नक्षलवादी ठार झाले किंवा शरण आले.
सरकारने विकास, रस्ते, मोबाईल कनेक्टिव्हिटी व रोजगार योजनांवर भर दिल्यामुळे नक्षल प्रभाव क्षेत्र २०२५ मध्ये ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचले.