

India Russia relations
esakal
डिसेंबर २०२५ मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जेव्हा नवी दिल्लीत भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेकरिता आले, तेव्हा त्यांना मिळालेला स्वागताचा माहोल केवळ औपचारिक नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर स्वतः जाऊन केलेले स्वागत हे जागतिक समीकरणात मोठे बदल होत असतानाही भारत आणि रशिया हे आपली ऐतिहासिक मैत्री आणि धोरणात्मक नातेसंबंध महत्त्वाचे मानतात असा स्पष्ट राजनैतिक संकेत होता. संरक्षण, ऊर्जा, आरोग्य आणि व्यापार अशा १६ करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि या संबंधांना नवा आकार देण्याची तयारी दाखवली. पण आजचा जागतिक संदर्भ पूर्वीच्या शीतयुद्ध काळापेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे पुतिन यांच्या भेटीनंतर भारत-रशिया संबंधांचे स्वरूप, त्यातील ताणतणाव आणि पुढील दिशा या सर्वांवर देशात चर्चा सुरू झाली आहे.