
Without India, the UN Security Council Loses Its Legitimacy
E Sakal
The Battle for the Security Council: India’s Rise and the Politics of Veto
लेखक : महेश शिंदे
कल्पना करा एका जागतिक टेबलावर सर्वात प्रभावशाली पाच राष्ट्रे बसलेली आहेत आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र, जगातील सर्वाधिक लोकसंख्या, अवकाश तंत्रज्ञान, आण्विक क्षमता आणि शांतिरक्षणात अग्रणी योगदान असलेला देश मात्र त्या टेबलावर अनुपस्थित आहे. हीच विसंगती आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दिसते. १९४५ च्या सत्तासंतुलनावर उभारलेली रचना आजच्या वास्तवाशी विसंगत ठरते.