Premium|Study Room : आंतरराष्ट्रीय संबंध बदलत्या भारत–आफ्रिका संबंधांचा ग्लोबल साउथवर काय परिणाम होईल?

India's developmental cooperation with African nations : भारत आणि आफ्रिका यांच्यातील प्राचीन व्यापारापासून ते २०२६ च्या शिखर परिषदेपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास; ग्लोबल साउथचा आवाज बुलंद करणारी भागीदारी, आर्थिक आव्हाने आणि चीनच्या वाढत्या प्रभावावर मात करत भविष्यातील 'धोरणात्मक' संधींचा घेतलेला सविस्तर आढावा.
India's developmental cooperation with African nations

India's developmental cooperation with African nations

esakal

Updated on

लेखक : वैभव खुपसे

भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध आज एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहेत. हे संबंध इतिहासातून निर्माण झाले असले तरी आजच्या काळात ते भूराजकीय आणि आर्थिक गरजांमुळे अधिक मजबूत होत आहेत. या संबंधांची सुरुवात प्राचीन काळातील समुद्री व्यापारातून झाली आणि वसाहतवादी काळात दोन्ही प्रदेशांनी एकत्रितपणे शोषण आणि स्वातंत्र्यलढ्याचा अनुभव घेतल्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले. आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना भारताने दिलेला पाठिंबा आणि अलिप्ततावादी चळवळीतील सहकार्यामुळे या संबंधांना नैतिक आणि राजकीय आधार मिळाला. कालांतराने हे नाते अधिक संस्थात्मक आणि धोरणात्मक स्वरूपाचे झाले असून भारत–आफ्रिका फोरम शिखर परिषद आणि वाढते राजनैतिक संबंध यामुळे ते अधिक दृढ झाले आहेत.

अलिकडच्या काळात या भागीदारीला नवीन गती मिळाली आहे, कारण जागतिक स्तरावर आफ्रिकेचे महत्त्व वाढत आहे. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनला G20 मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवून देणे ही एक महत्त्वपूर्ण घटना ठरली. यामुळे ग्लोबल साउथचा आवाज अधिक मजबूत झाला आणि आफ्रिकेला जागतिक आर्थिक व्यवस्थेत योग्य स्थान मिळाले. त्याचबरोबर इथिओपिया, नायजेरिया यांसारख्या देशांशी वाढलेले संबंध आणि 2026 मध्ये होणाऱ्या भारत–आफ्रिका शिखर परिषदेसाठी सुरू असलेली तयारी यामुळे या संबंधांना अधिक बळ मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com