Premium|Study Room : सागर ते महासागर - भारताचे सागरी धोरणात कोणते मोठे बदल.?

India's Maritime Strategy : भारताच्या MAHASAGAR सागरी धोरणाद्वारे हिंद महासागरातील सुरक्षा, ब्लू इकॉनॉमी, प्रादेशिक सहकार्य, इंडो-पॅसिफिकमधील रणनीती आणि ग्लोबल साऊथ देशांसोबतच्या भागीदारीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न.
India's Maritime Strategy

India's Maritime Strategy

esakal

Updated on

लेखक - सागर रेपाळे

MAHASAGAR (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions)

MAHASAGAR (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) हे भारताच्या सागरी धोरणाचे (Maritime Doctrine) नवीन रूप असून, मार्च २०२५ मध्ये मॉरिशस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली. यामध्ये भारताच्या SAGAR (Security and Growth for All in the Region) या पूर्वीच्या धोरणाचा विस्तार करून भारताला Global South देशांचा विश्वासार्ह भागीदार आणि जागतिक सागरी शक्ती म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

भारताच्या सागरी धोरणाची उत्क्रांती SAGAR (2015) पासून सुरू झाली. या धोरणाचे पाच प्रमुख स्तंभ म्हणजे सागरी सुरक्षा, ब्लू इकॉनॉमीद्वारे आर्थिक सहकार्य, क्षमता विकास व आपत्ती व्यवस्थापन, शाश्वत विकास आणि प्रादेशिक संपर्क व पायाभूत सुविधा हे होते. २०१८ मध्ये Indo-Pacific Vision द्वारे भारताने आपल्या सागरी दृष्टिकोनाचा विस्तार करून ASEAN चे केंद्रस्थान आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला समर्थन दिले. त्यानंतर MAHASAGAR (2025) द्वारे भारताने सुरक्षा, आर्थिक राजनय, तांत्रिक संपर्क आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समन्वय असलेले व्यापक जागतिक सागरी धोरण स्वीकारले.

India's Maritime Strategy
Premium|India Geo politics : भारताचा भू-राजकीय ग्रेट गेम
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com