
अस्थिर लोकशाही आणि नेपाळच्या तरुणाईचा उठाव
ई सकाळ
नेपाळ सध्या तीव्र राजकीय अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडले आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधातील असंतोषामुळे तरुणांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या निदर्शनांमध्ये सरकारी इमारतींवर हल्ले झाले, अनेक नेत्यांची घरे जाळली गेली आणि किमान ५० लोकांचा बळी गेला. वाढत्या दबावामुळे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि संसद बरखास्त करण्यात आली. त्यानंतर सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली या पदावर पोहोचणाऱ्या त्या नेपाळच्या पहिल्या महिला ठरल्या. आता नव्या निवडणुका ५ मार्च २०२६ रोजी होणार आहेत, मात्र आर्थिक संकट, सीमावाद आणि राजकीय व्यवस्थेवरील अविश्वास कायम आहे.