

NITI Aayog New Leadership in 2026
esakal
अभिजित मोदे
नीती आयोग (National Institution for Transforming India - NITI) ही भारत सरकारची शिखर धोरण-निर्माण संस्था आहे. १ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या आयोगाने पूर्वीच्या ‘योजना आयोगा’ची जागा घेतली. सध्या २०२६ मध्ये या आयोगात मोठ्या प्रमाणात नवीन लोकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत, ज्यामुळे त्याची रचना आणि कार्यपद्धतीत महत्त्वाचे बदल घडले आहेत.
नीती आयोगाचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि इतर सदस्यांची नेमणूक केंद्र सरकार करते. उपाध्यक्ष हे सहसा अर्थतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी किंवा वरिष्ठ नागरिक असतात. CEO हा केंद्र सरकारच्या सचिव दर्जाचा अधिकारी असतो.