

1991 Indian Economic Reforms
esakal
सध्या जगामध्ये अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यामध्ये युद्धस्थिती असल्यामुळे स्ट्रेट ऑफ हार्मोझमधून जहाज वाहतूक होत नसल्याने भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवत आहे, यामुळे देशामध्ये गॅस, पेट्रोल-डिझेलसाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. हे सगळे होत असताना हा विचार आला की जर कदाचित आपल्याकडे पेट्रोल-डिझेल आणि गॅस निर्यात झाला नाही, तर तरी संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होऊन एका जागी थांबेल. आजच्या सारखीच अवस्था १९९१ मध्ये भारतावर ओढवली होती. भारताकडे केवळ दोन आठवड्यांपुरताच परकीय चलनसाठा होता आणि जर परकीय चलनसाठा संपला असता, तर असेच गॅस आणि पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागल्या असत्या आणि अर्थव्यवस्था ठप्प झाली असती; परंतु यातून मार्ग काढण्यासाठी भारताला आर्थिक सुधारणा कराव्या लागल्या. यात आर्थिक सुधारणांचे महत्त्व आहे.
२४ जुलै १९९१ मध्ये भारतामध्ये आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणेला आज जवळपास ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आर्थिक सुधारणा कराव्या लागल्या म्हणजे याचा अर्थ असा होतो की अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी समस्या होती, ज्यामुळे आपल्याला सुधारणा करावी लागली. मग ह्या सुधारणा झाल्यानंतर खरंच आपण सुधारलो आहोत का? याचा विचार करणं आवश्यक आहे.