Indian society 2025
esakal
Study Room
Premium|Study Room : २०२५ चा आरसा; प्रगतीची लखलखती झळाळी की सामाजिक विषमतेच्या गडद भेगा?
Indian society 2025 : २०२५ हे वर्ष भारतीय समाजासाठी डिजिटल क्रांती आणि प्रगतीचे प्रतीक ठरले असले तरी, त्याच वेळी लिंगभेद, बेरोजगारी आणि हवामान बदलासारख्या सामाजिक विषमतेच्या भेगाही या वर्षाने अधिक स्पष्ट केल्या.
सत्यजित हिंगे
इ.स. २०२५ हे वर्ष भारतीय समाजासाठी केवळ घटनांनी भरलेले वर्ष नव्हते, तर सामाजिक संरचनेच्या आतल्या ताणतणावांना उघड करणारे एक निर्णायक पर्व ठरले. अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि राजकारण यांची गती वेगवान होत असताना समाजमन मात्र प्रश्नांनी, असुरक्षिततेने आणि नव्या आकांक्षांनी भरलेले दिसले. या वर्षाने भारतीय समाजाचा आरसा अधिक स्वच्छपणे समोर धरला, ज्यात प्रगतीची झळाळी जितकी दिसली, तितक्याच ठळकपणे विषमतेच्या भेगा जाणवल्या.

