
सकाळ स्टडीरूमच्या माध्यमातून चालू घडामोडींची माहिती देत आहोत.
१) भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन राजीनामा दिला. उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींना संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी राजीनामा देऊ शकतात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६७ मध्ये उपराष्ट्रपतींच्या पदावधी (Term of office) बाबतच्या तरतुदी आहेत.