Premium|Study Room : अमेरिका–सौदी अणुऊर्जा करार; पश्चिम आशियात स्थैर्य येणार की नव्या अण्वस्त्र स्पर्धेची सुरुवात?

US Saudi Nuclear Deal : अमेरिका–सौदी नागरी अणुऊर्जा करारामुळे पश्चिम आशियातील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. ऊर्जा सहकार्याबरोबरच प्रादेशिक स्थैर्य, इराणचे आव्हान आणि अण्वस्त्र स्पर्धेच्या धोक्यावरही चर्चा सुरू झाली आहे.
US Saudi Nuclear Deal

US Saudi Nuclear Deal

esakal

Updated on

लेखक : महेश शिंदे

'आंतरराष्ट्रीय राजकारणात तंत्रज्ञान हे केवळ तंत्रज्ञान नसते. प्रत्येक अणुभट्टी केवळ इंधनच निर्माण करत नाही, तर ती सामरिक प्रभाव, राजनैतिक दबाव आणि प्रादेशिक सत्तासंतुलन बदलण्याची क्षमता देखील निर्माण करते. 'अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेला नागरी अणुऊर्जा सहकार्य करार हा केवळ ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी नसून त्यापेक्षाही कितीतरी व्यापक आहे. इराण–इस्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील वेगाने बदलणारे सामरिक समीकरण, अमेरिकेची नव्याने वाढलेली सक्रियता आणि तेलोत्तर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या आखाती देशांच्या पार्श्वभूमीवर हा करार संपूर्ण पश्चिम आशियाच्या भूराजकीय संरचनेला नव्याने आकार देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

सौदी अरेबिया या कराराकडे आर्थिक आधुनिकीकरणाचे साधन म्हणून पाहते, तर अमेरिकेच्या दृष्टीने तो प्रादेशिक स्थैर्यातील एक महत्त्वाची सामरिक गुंतवणूक आहे. मात्र, स्वच्छ ऊर्जेच्या आश्वासनामागे एक मूलभूत प्रश्न कायम आहे. तो म्हणजे हा करार पश्चिम आशियात स्थैर्य निर्माण करेल की अण्वस्त्र स्पर्धेच्या नव्या पर्वाला सुरुवात करेल?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com