

Vikram 1 Rocket
esakal
लेखक - सुदर्शन कुडचे
भारताच्या अंतराळ क्षेत्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. सरकारी संस्थेबरोबरच खासगी उद्योगांनाही अंतराळ क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाल्यानंतर अनेक नवउद्योगांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर स्कायरूट या भारतीय उद्योगसंस्थेने विकसित केलेल्या विक्रम-१ या प्रक्षेपणयानाचे यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. भारतातून प्रथमच खासगी क्षेत्राने विकसित केलेल्या कक्षीय प्रक्षेपणयानाने उपग्रह यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवून भारतीय अंतराळ उद्योगासाठी नवे पर्व सुरू केले आहे.
विक्रम-१ हे भारतातील खासगी क्षेत्राने विकसित केलेले पहिले कक्षीय प्रक्षेपणयान आहे. याची निर्मिती हैदराबादस्थित स्कायरूट या उद्योगसंस्थेने केली आहे. हे प्रक्षेपणयान लहान आणि मध्यम आकाराचे उपग्रह पृथ्वीच्या कमी उंचीवरील कक्षेत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सुमारे साडेतीनशे किलोग्रॅम वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या सुमारे चारशे पन्नास किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेण्याची क्षमता या प्रक्षेपणयानात आहे. आधुनिक रचना, हलके साहित्य आणि नाविन्यपूर्ण निर्मिती तंत्राचा वापर ही त्याची वैशिष्ट्ये मानली जातात.