लेखक : सचिन शिंदे
आपण दररोज ज्या वस्तू विकत घेतो, जसं की भाजीपाला, धान्य, इंधन, कपडे, औषधं त्यांचे दर दिवसागणिक वाढत असतात. या दरवाढीस आपण महागाई म्हणतो. पण ही महागाई मोजायची कशी? ही महागाई मोजण्यासाठी सरकार एक महत्त्वाचं साधन वापरतं. त्याला म्हणतात ग्राहक किंमत निर्देशांक, म्हणजेच Consumer Price Index (CPI). याला महागाईचा निर्देशांक असेही म्हणतात. अलीकडेच सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) महत्त्वाचा निर्णय घेत सीपीआयचे पायाभूत वर्ष २०११-२०१२ वरून २०२३-२४ करायचं ठरवलं आहे.