Novak Djokovic | US Open 2024Sakal
टेनिस
IPL विजेत्याला मिळणारे 20 कोटी जास्त वाटतात? मग US Open मध्ये खेळाडूंना मिळणारी बक्षीस रक्कम वाचाल तर...
US Open 2024 Prize Money: अमेरिकन ओपन या टेनिस स्पर्धेसाठी यंदा बक्षीस रक्कमेत १५ टक्क्याने वाढ करण्यात आली असून खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत.
US Open 2024 Prize Money Details: भारतात होणाऱ्या आयपीएलसारख्या श्रीमंत टी२० स्पर्धेसाठी विजेत्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाते. अनेकांच्या मते ही मोठी बक्षीस रक्कम आहे. पण टेनिसमध्ये मिळणारी बक्षीस रक्कम यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक आहे.
टेनिसमध्ये दरवर्षी ४ महत्त्वाच्या स्पर्धा म्हणजे ग्रँड स्लॅम होत असतात. या चार ग्रँड स्लॅमपैकी वर्षाचील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा अमेरिका ओपन होते. यंदा ही स्पर्धा २६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे.
त्यामुळे या स्पर्धेसाठी बक्षिर रक्कमही जाहीर झाली आहे. २०२३ वर्षापेक्षा यंदा १५ टक्क्याने बक्षीस रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. यंदा एकूण मिळून ७५ मिलियन अमेरिकन डॉलरचे बक्षीस रक्कम आहे, म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण ५५५ कोटी रुपयांची बक्षीसं देण्यात येणार आहेत.

