Maharashtra's Rutuja Bhosale and Vaishnavi Adkar will make their World Tennis League debut in Bengaluru
बंगळुरू : वर्ल्ड टेनिस लीगच्या (WTL) पाचव्या पर्वासाठी आंतरराष्ट्रीय टेनिसमधील काही दिग्गज खेळाडू बंगळुरूमध्ये दाखल होणार आहेत. माजी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहिलेली एलिना स्वितोलिना, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती बेलिंडा बेन्शिच, माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेली कारोलिना प्लिश्कोव्हा, विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा निक किर्गिओस आणि दोन वेळचा विम्बल्डन दुहेरी विजेता हॅरी हेलिओव्हारा यांच्यासह एकूण १६ खेळाडू या पर्वात सहभागी होणार आहेत. ही लीग १७ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत बंगळुरू येथील केएसएलटीए, एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.