जगातील स्वस्त ठिकाणांच्या यादीत भारतातील दोन शहरं

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

जगातील स्वस्त शहरांचे रँकिंग इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने प्रसिद्ध केलं आहे. 2020 वर्ल्ड वाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेच्या आधारवर जगातील 130 शहरांमधील रँकिंग जारी करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - आपल्या आजुबाजुचं वातावरणं स्वच्छ आणि सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपण ज्या शहरात, गावात राहतो तो परिसर स्वच्छ असावा अशी इच्छा असते. याशिवाय इतर सोयीसुविधा, येणारा खर्च इत्यादी गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या ठरतात. जगातील स्वस्त शहरांचे रँकिंग इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने प्रसिद्ध केलं आहे. 2020 वर्ल्ड वाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेच्या आधारवर जगातील 130 शहरांमधील रँकिंग जारी करण्यात आले आहे. यामध्ये जगातील सर्वात स्वस्त शहरांमध्ये भारतातील दोन शहरांचा समावेश आहे.

इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जारी केलेल्या रँकिंगमध्ये सर्वात महागड्या शहरांमध्ये हाँगकाँग आणि पॅरिसचा समावेश आहे. तर स्वस्त शहरांमध्ये दमिश्क आणि ताश्कंद यांचा समावेश आहे. स्वस्त शहरे आणि महागड्या शहरांबाबतचा हा सर्व्हे वर्षातून एकदा केला जातो. मात्र कोरोनाचा परिणाम कसा झाला हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे दुसऱ्यांदा करण्यात आला. त्यानंतर 130 शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

हे वाचा - राजेशाही थाट असलेली महाराजा एक्सप्रेस; एका तिकिटाची किंमत 18 लाख रुपये

सर्व्हे करत असताना त्यामध्ये घरात खाण्या-पिण्यावर होणारा खर्च, किराणा, रोजचा ऑफिस येण्या-जाण्याचा खर्च, वीज-पाणी बिल इत्यादीचा समावेश असतो. याशिवाय शहरातील ट्रान्सपोर्ट, बाजार इत्यादीचा विचार केला जातो. या सर्व निकषांच्या आधारे तयार केलेल्या या स्वस्त शहरांच्या यादीमध्ये नवव्या स्थानावर बेंगळुरू आणि चेन्नई आहेत. याधाधी झालेल्या सर्व्हेमध्ये चेन्नई आठव्या, बेंगळुरू नवव्या तर दिल्ली  शहर 10 व्या स्थानावर होते.

पहिल्या स्थानावर दमिश्क, दुसऱ्या स्थानी ताश्कंद तर तिसऱ्या स्थानावर लुसाका आणि काराकस ही शहरे आहेत. त्यानंतर यादीत अल्माटी, कराची आणि ब्यूनस आयर्स, अल्जीअर्स या शहरांचा क्रमांक लागतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheapest cities in world list two from india