चेन्नईपासून अगदी जवळ आहेत 'हे' हिल स्टेशन, ज्यामुळे शांतता व प्रसन्ना मिळेल

अर्चना बनगे
Saturday, 20 February 2021

दक्षिण भारतातील चेन्नई हे  ठिकाण  सांस्कृतिक  आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले आहे.

कोल्हापूर: हिल स्टेशन एक अदभुत आनंद देणारे ठिकाण असते. जर तुम्हाला हिलस्टेशन आवडत असतील तर चेन्नई जवळ असलेल्या या हिल स्टेशनना एक वेळ जरूर भेट द्या. दक्षिण भारतातील चेन्नई हे  ठिकाण  सांस्कृतिक  आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले आहे. बंगालच्या खाडी  मधिल कोरोमंडल च्या काठावर चेन्नई वसलेले आहे. चेन्नई मधील अनेक ठिकाणे आकर्षित करणारी आहेत. चेपॉक महल पासून ते पार्थसारथी मंदिर , सेंट जॉर्ज फोर्ट, असे अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.

चेन्नई मध्ये असलेले मरिना बीच जगातील दुसऱ्या नंबरचे सर्वात लांब समुद्र बीच आहे. या ठिकाणी सर्प उद्यान  साकारले  आहे. तेथे तब्बल 500 पेक्षा जादा जातीचे अनेक साप पाहावयास मिळतात.परंतु या ठिकाणचे वातावरण नेहमीच उष्ण असते. त्यामुळेच अनेक पर्यटक या ऐवजी इतर ठिकाणी आपला वेळ पाहण्यासाठी घालवतात. जर तुम्हाला चेन्नईच्या बाहेर अत्यंत निसर्गसंपन्न असे  हिल स्टेशन शोधत असाल  आणि तुम्हाला त्या ठिकाणी सुट्टी घालवायची आहे तर  अत्यंत विलोभनीय असे हिलस्टेशन बाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

एलगिरी हिल स्टेशन
 चेन्नई पासून 230 किलोमीटर अंतरावर  एलगिरी हिल स्टेशन आहे. प्रचंड वृक्षवल्ली, घाट, डोंगर माथा आणि ऑर्किड फुलांनी भरलेले हे ठिकाण अनेकांना आकर्षित करणारे आहे. जर तुम्ही याठिकाणी जाणार असाल तर पुंगणुर धबधबा पहावयास विसरू नका. याठिकाणी तुम्ही बोटींचा ही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणचे अत्यंत मनोरम असे सुंदर दृश्य अनेकांना आकर्षित करते. जर तुम्हाला शहरापासून एका निवांत ठिकाणाचा शोध असेल तर हे हिल स्टेशन तुमच्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे.

सिरुमलाई हिल स्टेशन
तामिळनाडूतील तिरुमलाई हे एक असे हिल स्टेशन आहे जे घाटामध्ये वसलेले आहे. विविध वनस्पती आणि विविध जीवांचे  विस्तृत वास्तव्य या ठिकाणी आहे. मनाला अत्यंत अल्हाददायक असे दृश्य या ठिकाणी पाहावयास मिळते. चेन्नई पासून सुमारे 465 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणापासून अंबुरई आणि कोडाईकॅनाल हे दोन रेल्वे स्टेशन आहेत. येथील दिंडीगुल रॉक फुट अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण आहे . आलेले अधिकांश पर्यटक या ठिकाणाला पसंती देतात.

कोल्ली हिल्स स्टेशन
अत्यंत दाट हिरवाईने नटलेले चेन्नई जवळचे सर्वात अधिक जवळचे रेल्वेस्टेशन म्हणजे कोल्ली हील्स होय. कोल्ली हिल्स चेन्नई पासून सुमारे 357 किलोमीटर अंतरावर आहे. चहा आणि कॉफी च्या बागासाठी हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. व्यावसायिक पर्यटनाबरोबरच हे हिल स्टेशन निसर्ग अभ्यासक, ट्रेकिंग, मेडिटेशन प्रॅक्टिशनर आणि भटकंती करणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे. फेब्रुवारी ते डिसेंबर या कालावधीत या ठिकाणचे वातावरण अत्यंत चांगले असते. या ठिकाणी असणारी गुफा पर्यटकांना विशेष आकर्षित करतात.

पलानी हिल्स

ट्रेकिंग करण्यासाठी अत्यंत चांगला स्पॉट  शोधत असाल तर पलानी हिल्स ला जरूर भेट द्या. तमिळनाडूच्या पश्चिम घाटात अन्नामलाई परिसरात हे ठिकाण आहे. हा परिसर अत्यंत घनदाट जंगलाने व्यापून गेला आहे. त्यामुळे हे ठिकाण वन्यप्राण्यांसाठी आरक्षित आहे. ट्रेकिंग बरोबर याठिकाणी तुम्ही हायकिंग चा सुद्धा आनंद घेऊ शकता. चेन्नई पासून पाचशे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाताना जवळचे रेल्वे स्टेशन हे मदुराई आहे. या हिल स्टेशनवर असलेल्या अविनाश कुंडी मंदिरला तुम्ही जरूर भेट द्या. हे मंदिर भगवान मुरुगा ला समर्पित आहे.  भगवान मुरुगा हे या मंदिरामध्ये शाही दरबार भरवत असत आणि त्या ठिकाणी संत आणि देव-देवता यांची उपस्थिती  राहत होती अशी या ठिकाणची अख्यायिका आहे.

कोटागिरी हिल स्टेशन
तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यात असलेले कोटागिरी हिल स्टेशन परदेशी चहाचे मळे आणि अत्यंत हिरवाईने नटलेला परिसर यासाठी प्रसिद्ध आहे. ट्रेकिंग साठी सुद्धा हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. चेन्नईपासून 538 किलोमीटर अंतरावर हे हिल स्टेशन असून चांगल्या हिल स्टेशन मध्ये या ठिकाणाचा ही समावेश होतो. या ठिकाणचे जवळचे रेल्वे स्टेशन कोईमत्तूर आहे.  कोडाणाड  पॉईंट या ठिकाणी तुम्हाला एक अदभूत नजराना पहावयास मिळतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chennai hill station tourism tips marathi news