काय सांगता! परदेशातही चालतंय भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 2 January 2021

तुम्हाला फिरण्याचा छंद असो किंवा नसो, पण तुम्हाला एकदा तरी परदेशात जाण्याची इच्छा नक्कीच असेल.

नवी दिल्ली- तुम्हाला फिरण्याचा छंद असो किंवा नसो, पण तुम्हाला एकदा तरी परदेशात जाण्याची इच्छा नक्कीच असेल. दुसऱ्या देशात जाऊन लाँग ड्राईव्हचा आनंद घेण्याचं तुमचं स्वप्न असल्यासं ते पूर्ण होऊ शकते. कारण, जगात असे काही देश आहेत, जेथे भारतीय ड्रायव्हिंग लायसेंस वैध मानले जाते. जर तुम्हाला इंग्रजी येत असेल आणि ट्रॅफिक रुल फॉलो करण्याची तयारी असेल तर पुढील देशात तुम्ही विना अडथळा ड्रायव्हिंग करु शकता.

सिंगापूर- सिंगापूरमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसेंस (Indian Driving License) एक वर्षासाठी वैध आहे. पण, तुम्हाला इंग्रजी येणे अनिवार्य आहे. 

जर्मनी- जर्मनीमध्ये तुम्ही विनाअडथळा भारतीय ड्रायव्हिंग लायसेंसवर लाँग ड्राईव्हला जाऊ शकता. येथील तुमचे लायसेंस 6 महिन्यापर्यंत वैध असते. 

ऑस्ट्रेलियाने बदलला राष्ट्रगीतातला एक शब्द; असं करण्यामागे नेमकं कारण काय?

इंग्लंड- भारतीय ड्रायव्हिंग लायसेंस इंग्लडमध्येही एक वर्षापर्यंत वैध मानलं जातं. या लायसेंसवर तुम्ही स्कॉटलँड किंवा वेल्समध्येही गाडी चालवू शकता. पण, तुम्हाला स्थानिक ट्रॅफिक नियमांचे पालन करावे लागेल. 

नॉर्वे- नॉर्वेमध्ये तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसेंससोबत विनाअडथळा तीन महिन्यांपर्यंत ड्राईव्ह करु शकता. पण, तुम्हाला इंग्रजी येणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही स्थानिक आरटीओ ऑफीसला भेट देऊ शकता. 

स्वित्झलँड- स्वित्झलँडमध्येही (Switzerland) तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसेंसने कार चालवू शकतात. स्वित्झर्लंडमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसेंसची वैध्यता 1 वर्षापर्यंत आहे. एक वर्षानंतर तुम्हाला स्थानिक आरटीओची परवानगी घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्ही कार चालवू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: long drive in these foreign countries using indian driving license